Robotics Technology : रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा इतिहास व भविष्य
Introduction :
आजच्या युगात मानवाने तंत्रज्ञान व विज्ञान क्षेत्रात भरपूर प्रगती केली आहे. तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर मध्ये बरेच मार्ग निर्माण झाले आहेत. यापैकीच रोबोटिक्स सायन्स हे एक उत्तम क्षेत्र आहे. भविष्य काळात तंत्रज्ञान व विज्ञान क्षेत्रात रोबोटिक्स सायन्स हे दीर्घकालीन व उत्तम वेतन मिळवून देणारे क्षेत्र असणार आहे.
लहान मुले सुद्धा हे तंत्रज्ञान आत्मसात करतील. मुलांकरिता आशा प्रकारचे क्लासेस सुद्धा डिजाइन केले आहेत की मुले मजे मजेत सहज शिकून जातील. मित्रांनो आपण पहिलं असेल लहान मुलांना त्यांच्या आवडीचे काही काम दिले तर ते मोठ्या व्यक्तींपेक्षा अधिक लवकर व सुलभतेने शिकतात. Type of Robotics या लेखामध्ये आपण भारतातील महत्वाचे रोबोट व त्याचे तंत्रज्ञान समजून घेणार आहोत.
रोबोटिक्स म्हणजे काय ? What is Robotics?
रोबोटच्या तांत्रिक आणि वैज्ञानिक विषयीचा अभ्यास करणे म्हणजेच रोबोटिक्स होय.
रोबोटिक्स हे इंजीनियरिंग मधील एक क्षेत्र आहे ज्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स, Artificial intelligence, इलेक्ट्रॉनिक सायन्स, नॅनो टेक्नॉलजी, बायो टेक्नॉलजीचा समावेश आहे. रोबोटिक्स इंजीनियरिंग मध्ये रोबोटची निर्मिती, त्याची रचना व वापर कसा केला जातो याचा अभ्यास केला जातो.यामध्ये वेग वेगळ्या टेक्नोलॉजी एकत्र येत असल्याने हे एक मोठे क्षेत्र आहे ज्यामध्ये आपण विविध बाबींचा अभ्यास करू शकतो.
रोबोटिक्सचा इतिहास History of Robotics :
तसे पहायला गेले तर रोबोट ची कल्पना बर्याच काळापासून आहे. परंतु २० व्या शतकात त्याचा वापर प्रत्यक्षात येऊ लागला.- १९ व्या दशकाच्या सुरवातीला पहिला आधुनिक रोबोट तयार केला गेला. याचा वापर मुख्यत: औद्योगिक क्षेत्रात कार तयार करण्यात व जड वस्तू हलवण्याकरिता केला जात असे.
- १९५० ते १९६० च्या काळात संशोधकांनी अधिक वेगाने प्रगती करत पर्यावरणाशी संवाद साधणारे व किचकट काम करणारे रोबोट तयार केले. याच काळात रोबोटिक्स हा शब्द प्रचलित झाला.
- १९७० ते १९८० च्या काळात सेन्सर व संगणकांनी सुसज्ज यंत्रमानव तयार केले जे सभोवतालची परिस्थिती समजून अधिक अचूकतेने काम करू लागले.
- १९९० ते २००० च्या दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या प्रगती मुळे रोबोट अनुभवातून शिकण्यास व माहिती गोळा करण्यात सक्षम झाले. याच दरम्यान मोबाइल रोबोट्स चा उदय झाला ज्याचा वापर शोध आणि बचाव कार्याच्या मोहिमेमध्ये केला जाऊ लागला.
- अलीकडील काळात रोबोटचा वापर आरोग्यसेवेत शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांना मदत करणेसाठी, घरगुती काम जसे वैक्युम क्लीनर याशिवाय मनोरंजनात ही रोबोटचा वापर होऊ लागला.
- सध्याच्या युगात झपाट्याने प्रगती करत संशोधक असे रोबोट्स तयार करत आहेत जे मानवाच्या भावना समजू शकतील, त्यांना प्रतिसाद देऊ शकतात, मदत करू शकतात. जे अधिक बुद्धिमान व आपल्या दैनंदिन जीवनाशी एकरूप असतील.
प्रकार - Types of Robots :
रोबोट्स मध्ये बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक रोबोटची एक वेगळी कार्यक्षमता आहे. कार्य क्षमतेनुसार ते ठराविक क्षेत्रात काम करत असतात. यातील काही महत्वाचे रोबोटचे प्रकार पहाणार आहे.
- औद्योगिक यंत्रमानव: Industrial Robots
या प्रकारातील रोबोट हे मोठ मोठ्या कारखान्यामध्ये गाड्यांचे सुटे भाग एकत्र करून गाडी तयार करणे, वेल्डिंग करणे, रंगकाम करणे अशा प्रकारची कार्य करण्यात वापरली जातात. ज्यामुळे कामाचा दर्जा सुधारण्यास व किंमत कमी होण्यास मदत होते.
- सेवा रोबोट्स : Service Robots
या प्रकारातील रोबोटचा घरगुती, दवाखाने, व्यवसाय यासारख्या विविध ठिकाणी जसे सफाई करणे, अन्न वितरित करणे या कार्यात वापर केला जातो.
- सैनिकी रोबोट्स : Military Robots
हे रोबोट्स सैन्यदलामध्ये बॉम्ब निकामी करने व नजर ठेवणे यासारख्या कामात वापर केला जातो.
- अंतरीक्ष रोबोट्स : Space Robots
हे यंत्रमानव अवकाशाचा शोध घेणे, अवकाश स्थानके बांधणे, उपग्रह दुरुस्त करणे या प्रकारची कामे करत असतात.
- आरोग्य क्षेत्र : Healthcare
या क्षेत्रात रोबोटचा वापर मोठ मोठ्या दवाखान्यात सर्जरि करणे , पेशंटची काळजी घेणे, पुनर्वसन करणे अशा प्रकारची कार्य करण्यासाठी केला जातो. ज्यामुळे काळजी घेण्याचा दर्जा सुधारण्यास व किंमत कमी होण्यास मदत होते.
- वाहतूक यंत्रमानव : Transportation
हे रोबोट्स वाहतूक क्षेत्रात विमान चालवणे, गाडी चालवणे, जहाज ऑपरेट करणे करिता केला जातो जे कार्यक्षमता सुधारण्यास व सुरक्षा वाढवण्यास मदत करतात.
अधिक वाचा : Data Science Meaning | डेटा सायन्सचे भविष्य काय असेल ?
रोबोट कसे काम करते How Robot Works :
रोबोट्स हे सेन्सर , Actuators व कंट्रोल सिस्टम यांचा एकत्रित वापर करून कार्य करत असते.1. Sensors: सेन्सर
रोबोट मध्ये कॅमेरा, टच सेन्सर यासारखे सेन्सर असतात जे बाजूच्या वातावरणातील जशी एखादी वस्तु , अंतर, तापमान , आवाज यांची माहिती गोळा करते व रोबोटला पुरवत असते.
2. Control System: नियंत्रण प्रणाली
कंट्रोल सिस्टम म्हणजे जे रोबोटचा मेंदू . हा सेन्सर कडून आलेल्या माहिती च्या आधारे प्रोग्रामिंग व अलगोरीथम चा वापर करून माहितीचा अभ्यास करून रोबोटने काय अॅक्शन घ्यायची याचा निर्णय घेते.
3. Actuators:
हे रोबोटचे भाग आहेत जे जगाशी शारीरिकरित्या संवाद साधतात. ते रोबोटच्या स्नायू सारखे असतात. यामध्ये मोटर्स , चाके, हात आणि grippers याचा समाविष्ट आहे. नियंत्रण प्रणाली कडून Actuators ला कशी हालचाल करायची, कोणती अॅक्शन घ्यायची जसे पुढे जायचे, वळायचे, कोणती वस्तू उचलायची याच्या सूचना मिळतात.
हे सर्व भाग व त्याची प्रक्रिया मिळून रोबोट सभोवतालच्या परिस्थिति जाणून घेऊन कार्य करण्यास सक्षम होतात. ही रोबोटची मूलभूत तत्वे आहेत परंतु त्याचे कार्य त्याच्या डिजाइन व उद्देशानुसार बदलत असते.
भारतातील महत्वाचे रोबोट्स Main Robots in India :
भारतात विकसित झालेले बरेच उल्लेखनीय रोबोट आहेत त्यापैकि काही महत्वाचे रोबोट आपण जाणून घेऊया.
1. Mitra: मित्रा
हा बेंगलोर मधील एका कंपनीने मानवाशी संपर्क साधण्यासाठी डिजाइन केलेला ह्युमनॉइड रोबोट आहे. हॉटेल, दवाखाने, विमानतळ यासारख्या ठिकाणी माहिती पुरविणे, उत्तरे देणेकरिता याचा वापर केला जातो.
2. Manav: मानव
हा अजून एक ह्युमनोइड रोबोट आहे जो बंगलोर मधीलच इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स या संस्थेने तयार केला आहे. हा रिसर्च क्षेत्रात वापर करण्याच्या दृष्टीने डिजाइन केलेला रोबोट्स आहे. मानावचा मुख्य हेतु रोबोटिक संशोधनात प्रगाती करणे व मानवासारखे प्रगत रोबोटच्या विकासास हातभार लावणे.
3. Daksh: दक्ष
दक्ष हा DRDO या संस्थेने रीमोट Operated तयार केलेला रोबोट आहे . याचा मुख्य उद्देश सैन्य दलात बॉम्ब निकामी करणेच्या कामी वापर करणे आहे. दक्ष हा कॅमेरा , सेन्सर आणि Manipulator हाताने सुसज्ज आहे.
4. Robocop : रोबोकॉप
पोलिस कर्तव्य बजावण्यास सक्षम असणारा हा भारतातील पहिला रोबोकॉप हैदराबाद मध्ये सुरू करणायात आला. हा रोबोट चालणे , लोकांना ओळखणे , तक्रारी प्राप्त करणे , बॉम्ब निकामी करणे अशी पोलिसांची कामे करतो.5. Indro : इन्द्रो
हा भारतातील सर्वात उंच रोबोट आहे. ज्याची ऊंची 6.5 फुट आहे. याचा वापर सामाजिक व शैक्षणिक कामांसाठी केला जातो.
भारतात प्रभावित असणारी ही काही मुख्य रोबोट्स आहेत. रोबोटिक्स हे नेहमी विकसित होणारे क्षेत्र आहे. भविष्यात देशामध्ये बरीच नावीन्यपूर्ण रोबोट्स पहायला मिळण्याची आशा आहे.
अधिक वाचा : Computer Information in Marathi- संगणकाची माहिती मराठीमध्येनिष्कर्ष : Conclusion
रोबोटिक्सचे भविष्य भरपूर आशादायी आहे. तंत्रज्ञान जसजसे विकसित होत जाईल तसे रोबोट्स अत्याधुनिक व सक्षम होत जातील. विविध कार्याप्रमाणे वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रात याचा वापर केला जाईल. आपल्या जीवनाच्या कार्यपद्धतीमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता रोबोट्स मध्ये आहे.
तर मित्रांनो येणार्या काळात Robotics Technology ला आशादायी भविष्य आहे. आजच्या लेखात रोबोटिक्स म्हणजे काय ( What is Robotics) हे आपल्याला समजले असेल अशी मी आशा करतो . आपल्याला लेख आवडला असल्यास कमेंट करायला विसरू नका.
धन्यवाद ! जय महाराष्ट्र !
आपल्याला आवडेल अशी माहिती :
How to Use ChatGPT- ChatGPT चा वापर व त्याचे फायदे
ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी | Digital Payment Security
How to Validate Digital Signature | आधार कार्ड मधील Digital Sign
Gateway in Networking | गेटवे संगणक नेटवर्क मधील महत्वाचा पूल
What is Cryptocurrency in Marathi | क्रिप्टोकरन्सी सुरक्षित आहे काय



