How to Validate Digital Signature | आधार कार्ड मधील Digital Sign

How to Validate Digital Signature in pdf : आधार कार्ड मधील Digital Sign कशी Validate कराल ?

Validate Digital Signature : 


आजच्या या Digital युगात सरकारी कागदपत्रे हि Digital होत चालली आहेत. यामुळे या कागदपत्रात अधिकार्‍याची सही सुद्धा आता डिजिटल स्वरुपात येत आहे. सध्या बर्‍याच सरकारी कामातील कागदपत्रे ऑनलाइन डाऊनलोड करून घेता येतात. हि ऑनलाइन डाऊनलोड केलेली कागदपत्रे पीडीएफ फाइल च्या स्वरुपात असतात. यामध्ये सरकारी अधिकार्‍याची डिजिटल स्वरुपात सही असते. आधारकार्ड ऑनलाइन डाऊनलोड केल्यानंतर त्या फाइल मध्ये आपल्याला अशी Digital Signature दिसून येईल. हि डिजिटल स्वरूपातील सही फाइल ओपन केल्यानंतर Valid झाली नसेल तर त्या ठिकाणी Signature Invalid असल्याबाबत एक प्रश्न चिन्ह दिसून येते व Valid झाली असेल तर तेथे हिरव्या रंगातील बरोबर चिन्ह दिसून येते. जर कागदपत्रावर असे Iinvalid प्रश्नचिन्ह असेल तर अशा कागदपत्राची प्रिंट ग्राह्य धरली जात नाही. याकरिता हि सही ऑनलाइन valid करूनच प्रिंट काढावी लागते. परंतु बरेच जणांना हि सही Valid करताना अडचण येते. आजच्या या लेखामध्ये हि सही Valid कशी करायची, Valid करताना काय अडचण येऊ शकते व अशावेळी काय करायचे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.




    👆वरील चित्रात मी आपल्याला Digital Signature Valid करण्यापूर्वी व  Valid केल्यानंतरचा फरक दाखवलेला आहे.

    हे लक्षात असू द्या 👇

    • Digital Signature असणारी फाइल हि पीडीएफ स्वरुपात असल्याने आपल्या Computer अथवा लॅपटॉप वर Adobe PDF Reader लेटेस्ट व्हर्जन इंस्टॉल केलेले असावे.
    • Computer अथवा लॅपटॉप इंटरनेटशी कनेक्ट असावा.

    बरेच वेळा आपण इंटरनेटशी कनेक्ट असाल व पीडीएफ Reader लेटेस्ट असेल तर फाइल ओपन केल्याबरोबर Signature Validation Allow करण्याची विंडो दिसून येईल व Allow केल्यावर Signature Valid झालेली दिसून येईल. परंतु समझा अशी विंडो आली नाही अथवा तुम्ही Allow केले नाहीतर Not Valid दिसून येईल. अशा वेळी काही स्टेप आपल्याला मी दिल्या आहेत त्या पद्धतीने आपण केल्यास आपली Digital Signature Valid होऊन जाईल .

    How to Validate Digital Signature


    1. Validity Unknown  चे प्रश्न चिन्ह असलेल्या बॉक्स वर क्लिक करा .
    How to Validate Digital Signature

    2. अशी Signature Validity ची नवीन विंडो ओपन होईल. यातील Signature Properties वर क्लिक करा नवीन विंडो ओपन होईल.

    How to Validate Digital Signature



    3. Show Signature Certificate वर क्लिक करा.

    How to Validate Digital Signature



    4. यातील Trust टॅब वर क्लिक करून Add Trusted Certificate वर क्लिक करा.


    How to Validate Digital Signature



    5. Security चा मेसेज दिसून येईल ओके करा सर्टिफिकेट सेटिंग ची विंडो ओपन होईल.

    How to Validate Digital Signature



    6. यातील अशा प्रकारे सर्व पर्याय टिक करा व ओके वर क्लिक करा. 

    7. नवीन विंडो ओपन होईल. पुन्हा ओके करा.

    How to Validate Digital Signature


    8. पुन्हा अशी विंडो दिसून येईल यामध्ये Validate Signature वर क्लिक करा.


    How to Validate Digital Signature



    9. Validation ची प्रोसेस पूर्ण होऊन Signature Valid झालेले हिरवे चिन्ह दिसून येईल.👍


    How to Validate Digital Signature

    Digital Signature Validation

    Add Trusted Certificate Disabled 


    समजा Validation करताना काही चूक झाली व Signature Valid झाली नाही👎 तर पुन्हा वरील प्रमाणे 1 ते 4 पर्यंतची पद्धत अवलंबवा आणि पुढील प्रमाणे प्रोसेस करा. 

    1. आपल्याला अशी विंडो दिसून येईल . यामध्ये Add Trusted Certificate हा पर्याय Disable झालेला असेल.

    Add Trusted Certificate Disabled



    2. बाजूच्या कॉलम मध्ये आपल्या Certifiate ची लिस्ट दिसत असेल यामधील काही सर्टिफिकेटला Error दिसतं असेल त्या  सर्व सर्टिफिकेटची तुमच्याकडे नोंद करून घ्या व विंडो बंद करा.

    Add Trusted Certificate Disabled



    3. पीडीएफ फाइल च्या एडिट मेनूवर क्लिक करून त्यातील Preference पर्याय ओपन करा.

    Add Trusted Certificate Disabled



    4. यातील Signature सिलेक्ट करा. यातील Identities and Certificate मधील More वर क्लिक करा नवीन विंडो ओपन होईल. 


    Add Trusted Certificate Disabled



    5. Trusted Certificate वर क्लिक करा.

    6. Certificate ची लिस्ट असेल यातील तुम्हाला ज्या ज्या Certificate ला एरर येत आहे ते शोधा व Remove पर्यायावर क्लिक करून ते Certificate डिलीट करा आणि विंडो बंद करा.

    Add Trusted Certificate Disabled



    7. आता Add Trusted Certificate हा पर्याय Enable झालेला असेल.

    8. आता सुरवातीला सांगितल्या प्रमाणे सर्व Procedure पुन्हा करून घ्या आपली Digital Signature Valid होऊन जाईल.


    मित्रांनो अशा प्रकारे कोणत्याही PDF फाइल मध्ये जर Digital Signature असेल तर आपण सहज ही Signature Validate करू शकता. आपल्याला ही माहिती काशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका.

    धन्यवाद ! 🙏🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩


    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.