क्रिप्टोकरन्सी डिजिटल चलन - पारंपारिक चलनापेक्षा वेगळे
क्रिप्टोकरन्सी हे चलनाचे डिजिटल स्वरुपातील नवीन तंत्रज्ञान आहे ज्याचा वापर आज काल बर्याच ठिकाणी केला जातो व याची चर्चा , बातम्या आपल्या कानावर सध्या वारंवार पडत असतील यामुळे या चलनाबद्दल अधिक माहिती घेण्याची आपली उत्सुकता नक्कीच वाढली असेल आणि म्हणूनच What is Cryptocurrency in Marathi या लेखामध्ये आज आपण क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय , त्याचे कोणकोणते प्रकार आहेत, फायदे, तोटे, सुरक्षितता याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत जी आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल.
What is Cryptocurrency- क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ?
क्रिप्टोकरन्सी हे डिजिटल स्वरूपाचे चलन आहे जे सुरक्षित आणि योग्य व्यवहार करण्यासाठी तसेच नवीन निर्माण होणार्या युनिट्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी एनक्रिप्शन तंत्र वापरून तयार केल आहे . हे चलन कोणत्याही सरकार , वित्तीय संस्था किंवा केंद्रीय प्राधिकरणाद्वारे नियंत्रित केले जात नाही. यातील सर्व व्यवहारांची नोंद जगभरातील वापरकर्त्यांच्या नेटवर्कद्वारे ब्लॉकचेन नावाच्या सार्वजनिक लेजरवर ठेवली जाते. या चलनाचा वापर सेवा आणि वस्तू विकत घेणे तसेच इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी केला जाऊ शकतो, तुलनेने नवीन तंत्रज्ञान असलेने त्याचे मूल्य अस्थिर असू शकते. त्याची किंमत जलद आणि लक्षणीय बदलू शकते.
बिटकॉइन ही सध्याच्या काळातील सर्वात सुप्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी आहे. इथरियम, लाइटकॉइन आणि डोगेकॉइन यासारख्या इतर अनेक प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी आहेत. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारात भरपूर प्रमाणात गोपनीयता पाळली जाते ज्यामध्ये व्यवहार एखाद्या व्यक्तीच्या वास्तविक-जगातील संबधाशी जोडलेले नसतात. यामुळे मनी लाँड्रिंग आणि करचोरी यांसारख्या बेकायदेशीर कामांसाठी गुन्हेगारांनाही हे चलन आकर्षण बनले आहे. याला सरकारी नियंत्रण अथवा कोणतीही सुरक्षा नसली तरीही बर्याच व्यक्तींना ही करन्सी फायदेशीर वाटत असल्याने पेमेंटचा एक प्रकार म्हणून ते व्यवहारात वापरू लागले आहेत.
Types of Cryptocurrency- क्रिप्टोकरन्सीचे प्रकार
क्रिप्टोकरन्सीचे नेहमी नवनवीन प्रकार तयार होत असतात यातीलच काही प्रसिद्ध व लोकप्रिय प्रकार येथे दिले आहेत.
Bitcoin (BTC):
ही 2009 मध्ये तयार केली गेली होती जी आताची नंबर एकची आणि सर्वात प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी आहे, जी पारंपारिक पैशाला डिजिटल पर्याय म्हणून डिझाइन केलेली आहे आणि व्यवहार सुरक्षित करण्यासाठी विकेंद्रित ब्लॉकचेन लेजर वापरते .
इथरियम (ETH):
2015 मध्ये तयार झालेली ही आणखी एक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. ही देखील ब्लॉकचेनवर आधारित आहे जी Bitcoin पेक्षा अधिक लवचिक होण्यासाठी डिझाइन केलेली आहे, ज्यामुळे स्मार्ट कॉनटॅक्ट आणि विकेंद्रित ऍप्लिकेशन्स तयार होऊ शकतात.
रिपल (XRP):
ही क्रिप्टोकरन्सी आंतरराष्ट्रीय स्तरावर वित्तीय संस्थां आणि बँकाद्वारे पैसे हस्तांतरित करण्याचा मार्ग म्हणून वापरण्यासाठी डिझाइन केलेली आहे. जलद व्यवहार गती आणि कमी शुल्कासाठी ही क्रिप्टोकरन्सी ओळखली जाते.
Litecoin (LTC):
Bitcoin सारखीच ही क्रिप्टोकरन्सी आहे परंतु ती वापरण्याकरिता स्वस्त आणि जलद असावी आशा प्रकारे डिझाइन केलेली आहे. यातील व्यवहारामध्ये वेगळे अल्गोरिदम वापरले जाते.
Dogecoin (DOGE):
2013 मध्ये ही क्रिप्टोकरन्सी एक विनोद म्हणून सुरू झाली होती, परंतु तेव्हापासून तिचे महत्त्वपूर्ण अनुसरण झाले आहे. यामध्ये सुद्धा Bitcoin प्रमाणेच ब्लॉकचेन तंत्राचा वापर केला जातो परंतु उच्च अस्थिरता आणि कमी मूल्यसाठी ही ओळखले जाते.
बिटकॉइन कॅश (BCH):
2017 मध्ये ही क्रिप्टोकरन्सी तयार झाली जी बिटकॉइन ब्लॉकचेनमधील एक शाखा आहे . हे Bitcoin पेक्षा जलद आणि स्वस्त वापरण्यासाठी डिझाइन केले आहे.
वरील सर्व सध्या बाजारात अस्तित्वात असलेली प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सीची उदाहरणे आहे. प्रत्येकाचे स्वत:चे एक वैशिष्ट्य आणि उपयोग आहेत. क्रिप्टोकरन्सी बाजारात नेहमी नवीन नाणी व टोकन विकसित होत असतात.
How to use Bitcoin- बिटकॉइन चा वापर कसा करतात
बिटकॉइन चा वापर करण्यासाठी तुम्हाला बिटकॉइन वॉलेटची गरज असते. हे एक डिजिटल वॉलेट आहे या वॉलेट मध्ये तुम्ही बिटकॉइन साठवू शकता, पाठवू शकता तसेच घेवू सुद्धा शकता. मोबाइल Apps व डेस्कटॉप प्रोग्रामसह अनेक प्रकारचे बिटकॉइन वॉलेट उपलब्ध आहेत.
भारतामध्ये बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज किंवा पीअर-टू-पीअर मार्केटप्लेसद्वारे खरेदी करता येते. यासाठी तुम्हाला तुमचे बॅंक खाते एक्सचेंजशी लिंक करावे लागेल व नंतरच भारतीय रुपये वापरुन बिटकॉइन खरेदी करावे लागेल.
बिटकॉइन पाठविण्यासाठी तुमच्याकडे समोरील व्यक्तीच्या बिटकॉइन वॉलेटचा पत्ता व पाठवणारी रक्कम नोंद करणे आवश्यक असते. बिटकॉइन तुम्हाला प्राप्त करणेसाठी तुमचा बिटकॉइन वॉलेट पत्ता तुम्हाला समोरील व्यक्तीला द्यावा लागेल.
भारतातील काही व्यवसाय बिटकॉइन पेमेंटचा पर्याय स्वीकारतात. अशा ठिकाणी खरेदी करण्यासाठी तुम्ही बिटकॉइन वॉलेटचा वापर करू शकता.भारतात बिटकॉइन वापरावर सरकारी नियंत्रण नसल्याने रिजर्व बँकेने क्रिप्टोकरन्सी संबधीच्या धोकयाबद्दल सूचना जारी केली आहे. यामुळे तुम्ही यासंबधीचा योग्य तो अभ्यास करून स्वत:च्या जबाबदारीवर बिटकॉइन वॉलेट चा पर्याय वापरू शकता.
क्रिप्टोकरन्सीचे फायदे- Cryptocurrency Advantage
क्रिप्टोकरन्सी हे कोणत्याही सरकार किंवा बँकेसारख्या संस्थेकडून नियंत्रित केले जात नसल्याने कोणत्याही मध्यस्थ्याशिवाय व्यवहार पूर्ण करता येतात. व्यवहार फी कमी करून गुप्तता वाढवता येते.
किचकट क्रिप्टोग्राफी वापरून हे व्यवहार सुरक्षित केले जातात. यामुळे बनावटगिरी अथवा जादा खर्च करणे अशक्य होते. खरेदीदार व विक्रेते या दोघांनाही चांगली सुरक्षा दिली जाते.
क्रिप्टोकरन्सी व्यवहार हे निनावी असलेने हे व्यवहार वापरकर्त्याच्या वास्तवीक जगाशी संबधीत नसतात.
जिथेपर्यंत इंटरनेट कनेक्शन आहे तिथेपर्यंत बिटकॉइन कोठेही पाठवले जाऊ शकते. ज्यांना देशाबाहेर पैसे पाठवायचे अथवा प्राप्त करायचे आहेत त्यांच्याकरिता हा एक चांगला पर्याय बनला आहे. फक्त 21 दशलक्ष बिटकॉइन तयार करणेची मर्यादा असलेने टंचाई निर्माण होऊन कालांतराने याची किंमत वाढण्यास मदत झाली आहे.
क्रिप्टोकरन्सी वापरण्यातील धोके- Risk in Cryptocurrency
- क्रिप्टोकरन्सीच्या किंमती अत्यंत वेगाने व असुरक्षित बदलत असल्याने याच्या किंमती अस्थिर असतात. यामुळे स्थिर भांडवल म्हणून क्रिप्टोकरन्सीचा वापर करणे कठीण आहे.
- क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार क्रिप्टोग्राफी सुरक्षा वापरुन सुरक्षित केले जात असले तरी फिशिंग, हॅकिंग सारखे घोटाळे तसेच इतर सुरक्षा उल्लंघनामुळे बरीच चोरीची प्रकरणे घडली आहेत.
- भारत तसेच इतर काही देशांमध्ये यावर कोणतेही सरकारी नियंत्रण नसलेने फसवणूक अथवा घोटाळे झाल्यास वापरकर्त्यास कोणतीही मदत किंवा संरक्षण मिळत नाही.
- एकदम थोड्याच प्रमाणात याचा काही व्यवहारात वापर केला जात असल्याने दैनंदिन व्यवहारत याचा वापर करणे कठीण होऊ शकते.
क्रिप्टोकरन्सी सुरक्षित आहे काय ? is Cryptocurrency use is safe?
- क्रिप्टोकरन्सीची सुरक्षितता ही बर्याच गोष्टीवर अवलंबून आहे जसे क्रिप्टोकरन्सी वापर करणार्या व्यक्तीचे क्रिप्टोकरन्सी तंत्रज्ञानाचे असेलेले ज्ञान, त्याचा अनुभव तसेच वापरत असलेल्या वॉलेटची विश्वासहर्ता जाणून घेणे महत्वाचे असेल.
- क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार सुरक्षित केले जात असले तरी हॅकिंग, घोटाळे यासारख्या घडलेल्या घटना लक्षात घेता याचा वापर सावधपणे करणे गरजेचे आहे.
- भारतासह अनेक देशमाध्ये यावर नसलेले नियंत्रण याचा विचार करता वापरकर्त्यांने यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य तो अभ्यास करून स्वत:च्या जोखीमवर व्यवहार करावे लागतील.
What is Cryptocurrency in Marathi
निष्कर्ष : Conclusion
क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल चलन आहे ज्यामध्ये विकेंद्रीकरण (Decentralised), सुरक्षा, मर्यादित पुरवठा, निनावीपाणा यासारखे फायदे दिसत असले तरी अस्थिरता, नियमांचा अभाव, जटीलता , पर्यावरणावरील विपरीत प्रभाव यासारखे तोटे याचा ही विचार करणे गरजेचे आहे. क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी वापरकर्त्यांने स्वत:चे याबतीत संशोधन करून यात असलेल्या जोखमीबद्दल सतर्क असणे गरजेचे आहे.
FAQ : नेहमी विचारले जाणारे प्रश्न
1. क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?
क्रिप्टोकरन्सी हे डिजिटल चलन आहे ज्यामध्ये व्यवहार सुरक्षित करण्यासाठी आणि नवीन युनिट्सच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी क्रिप्टोग्राफीचा वापर केला जातो.
2. क्रिप्टोकरन्सी पारंपारिक चलनापेक्षा वेगळी कशी आहे?
क्रिप्टोकरन्सी विकेंद्रित आहे,म्हणजेच यावर कोणत्याही सरकार किंवा बँकेसारख्या केंद्रीय प्राधिकरणाद्वारे नियंत्रण ठेवले जात नाही जे अनेकदा निनावी असते. यातील व्यवहार सुरक्षित करण्यासाठी क्रिप्टोग्राफीचा वापर केला जातो.
3. मी क्रिप्टोकरन्सी कशी खरेदी करू शकतो?
तुम्ही याची खरेदी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज किंवा पीअर-टू-पीअर मार्केटप्लेसद्वारे करू शकता. तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड किंवा बँक खाते एक्सचेंजशी लिंक करावे लागेल आणि यानंतर आपले भारतीय रुपयाचे पारंपारिक चलन वापरून क्रिप्टोकरन्सी खरेदी करू शकता.
4. क्रिप्टोकरन्सी वापरण्यास सुरक्षित आहे का?
क्रिप्टोकरन्सीची सुरक्षितता ही बर्याच गोष्टीवर अवलंबून आहे जसे क्रिप्टोकरन्सी वापर करणार्या व्यक्तीचे क्रिप्टोकरन्सी तंत्रज्ञानाचे असेलेले ज्ञान, त्याचा अनुभव तसेच वापरत असलेल्या वॉलेटची विश्वासहर्ता जाणून घेणे महत्वाचे असेल.
5. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे धोके काय आहेत?
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना क्रिप्टोकरन्सी मार्केटची अस्थिरता, नियमांचा आणि पर्यवेक्षणाचा अभाव तसेच घोटाळे किंवा हॅकिंगच्या संभाव्यतेसह धोके असतात. तुम्ही जे गमावू शकता तेच गुंतवा.
मित्रांनो क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय व त्यासंबधी आपल्या मनात येणार्या प्रश्नांची उत्तरे या लेखाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे जो आपल्याला नक्कीच आवडेल अशी मला आहे. आपले या लेखा विषयीचे मत कमेंट करून सांगायला विसरू नका.
धन्यवाद 🙏🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩
हे ही वाचा आपल्याला आवडेल :