Computer Information in Marathi- संगणकाची माहिती मराठीमध्ये

संगणकाची संपूर्ण माहिती – Computer Information in Marathi- संगणक म्हणजे काय ?


Introduction :


            मित्रांनो संगणक हा आजच्या काळाची गरज बनला आहे. त्यामुळे तो रोज आपल्या वापरात येत असतो. शाळा, कॉलेज, प्रायव्हेट ऑफिस, सरकारी कार्यालय तसेच घरी सुद्धा संगणकाचा वापर केला जातो. आपण बँकेमध्ये पैसे काढणे करिता व पैसे भरणेची मशीन पाहिली असतील ती सुद्धा संगणका मार्फतच हाताळली जातात. यामुळे संगणकाची माहिती प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. परंतु आपल्याला त्याच्या पार्ट्स बद्दल व रचनेबद्दल, तसेच संगणक कसा काम करतो याबद्दल जादा माहिती नसलेने आपण तो हाताळायला घाबरत असतो म्हणूनच मी आज संगणकाबद्दल थोडक्यात आवश्यक ती माहिती या लेखाद्वारे आपल्या समोर घेऊन आलो आहे. जेणेकरून आपल्याला संगणक हाताळताना अडचण येणार नाही.

    Computer information in Marathi
    Computer Information in Marathi 

    संगणकाची व्याख्या – Definition of Computer

            संगणक एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याला दिलेल्या सूचनांच्या सेटनुसार डेटा प्रक्रिया करण्यासाठी आणि आउटपुट डिव्हाइसवरील कोणत्याही इच्छित स्वरूपात निकाल किंवा आउटपुट प्राप्त करण्यासाठी वापरला जातो.

    Computer Full Form : कॉम्प्युटरचा फूल फॉर्म


    C: Commonly O: Operated M: Machine P: Particularly U: Used for T: Technical and
    E: Educational R: Research

    Commonly Operated Machine Particularly Used for Technical and Educational Research


    Computer Information in Marathi

     History: संगणकाचा इतिहास - Computer History in Marathi

    संगणकाच्या शोधामध्ये BC (Before Christian) कालखंडापासून बर्‍याच व्यक्तींचा यामध्ये सहभाग आहे.
            मी येथे खाली एक लिस्ट दिली आहे, यावरून आपल्याला संगणकातील डेव्हलपमेंट मध्ये कसा बदल होत गेला आहे याची माहिती समजून जाईल.

            Type                            Year
    • Abascus                         B.C
    • Slide Rule                      1620
    • Pascal’s Calculator        1642
    • Leibnitz Calculator         1690
    • Jacquards Ioom             1801
    • Difference Engine           1822
    • Analytical Engine            1833
            
    Charles Babbage एक यांत्रिकी अभियंता (Mechanical Engineer) ज्यांना संगणकाचे जनक  असेही म्हटले जाते. यांनी प्रोग्राम करण्या योग्य अशा एका यांत्रिक संगणकाची संकल्पना तयार केली. 19 व्या शतकाच्या अगदी सुरवातीला म्हणजेच 1822 मध्ये त्यांनी Difference Engine नावाचे पहिले मशीन बनवले . यामध्ये गियर व शाफ्ट बसवले होते व ते मशीन वाफेच्या सहाय्याने चालत होते
            यानंतर सन 1833 मध्ये या इंजिनचे नवीन विकसित रूप तयार केले ज्याला प्रथम संगणक म्हटले जाते या संगणकाला Analytical Engine असे नाव देण्यात आले.

    Computer Information in Marathi- संगणकाची माहिती

    संगणकाची रचना : Main Parts of Computer information in Marathi

    संगणकाची रचना ही दोन विभागात विभागलेली असते.

    1. हार्डवेअर – संगणकातील मशिनी भाग जसे CPU, मदरबोर्ड, रॅम, हार्डडिस्क इ.

    2. सॉफ्टवेअर– सूचनांचा सेट म्हणजेच प्रोग्रॅम, ज्याच्या सहाय्याने संगणक आपले कार्य पूर्ण करतो.

    संगणकाचे मुख्य भाग   

    इनपुट डिव्हाईसेस Input Devices : 

    संगणकात माहिती भरण्यासाठी जी उपकरणे वापरली जातात ती म्हणजे इनपुट डिव्हाईसेस. जसे कीबोर्ड, माऊस, सीडी ड्राइव, स्कॅनर हे संगणकाचे इनपुट डिव्हाईसेस आहेत.

    आउटपुट डिव्हाईसेस Output Devices: 

    इनपुट डिव्हाईसेस मार्फत संगणकात भरलेल्या माहिती वर प्रक्रिया होऊन ज्या साधनांद्वारे माहिती प्रदर्शित केली जाते त्याला आउटपुट डिव्हाईसेस म्हटले जाते. जसे मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर हे आउटपुट डिव्हाईसेस आहेत.

    सीपीयू CPU (Central Processing Unit) : 

    संगणकातील इलेक्ट्रॉनिक सर्किट ज्याच्या सहाय्याने भरलेल्या माहितीवर प्रक्रिया करण्याचे काम केले जाते त्याला सीपीयू असे म्हटले जाते. हा संगणकातील महत्वाचा भाग असून याला संगणकाचा मेंदू असे संबोधले जाते.

    Processor :

    Computer Information in Marathi
    Processor 

    डेटा Data :

    डेटा म्हणजे संग्रह, जसे की संख्या, शब्द, मोजमाप, निरीक्षणे किंवा गोष्टींचे वर्णन. आपण संगणकात वेगवेगळ्या भाषेत माहिती टाइप करत असलो तरी संगणकाला ही भाषा समजत नाही. 0 व १ या दोन अंकांच्या संचाचा एक सांकेतिक कोड प्रत्येक अक्षरास, अंकास, चिन्हास तयार केला आहे यामार्फतच डेटा तयार केला जातो

    जसे : A = 00001010 P = 01110000 9 = 01011001

    डेटा कसा मोजतात : Computer Information in Marathi

    0 व १ यांच्या संचाने एक अक्षर किंवा अंक बनतो या सिस्टमला binary System म्हणतात. प्रत्येक 0 व १ ला बीट असे म्हटले जाते. आठ बिटच्या एका संचास बाईट म्हटले जाते

    बाईट , के.बी. – किलो बाईट , एम.बी. - मेगा बाईट , जी. बी. - गीगा बाईट , टी. बी. – टेरा बाईट
    8 बीट = 1 बाईट
    • 1024 बाईट              =     1 किलो बाईट (KB)
    • 1024 किलो बाईट     =     1 मेगा बाईट (MB)
    • 1024 मेगा बाईट       =     1 गिगा बाईट (GB)
    • 1024 गिगा बाईट      =     1 टेरा बाईट (TB)

    मदरबोर्ड ( Motherboard): 

    मदरबोर्ड हा संगणकातील इलेक्ट्रोनिक सर्किट बोर्ड आहे ज्याच्या सहाय्याने संगणकाच्या इतर महत्वपूर्ण भागांना एकत्र जोडले जाते व त्यांचे संभाषण ( कम्युनिकेशन ) घडवले जाते.

    Computer Information in Marathi
    Motherboard

    स्टोरेज डिवाइस ( Storage Device) : 

    याच्या नावावरून आपल्याला लक्षात आले असेल की स्टोरेज म्हणजेच साठवणूक करणारे साधन. उदा. Hard Disk, Flopy, Pendrive, CD

    रॅम ( रॅडम अॅक्सेस मेमरि ) RAM : 

    यामध्ये माहिती काही तात्पुरत्या स्वरुपात साठवली जाते. नवीन माहिती येताच पहिली माहिती पुसून (डिलिट) केली जाते.

    Computer Information in Marathi
    RAM


    ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच संगणक प्रणाली: Operating System

    ऑपरेटिंग सिस्टम ही संगणकावर चालणार्‍या सर्व सॉफ्टवेअर व हार्डवेअर वर नियंत्रण करत असते.

    मायक्रोसॉफ्टची विंडोज , अॅपलची मॅक, लिनक्स ह्या तीन लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत.

    मायक्रोसॉफ्टची विंडोज जगात सर्वात लोकप्रिय असलेली ऑपरेटिंग सिस्टम आहे.

    विंडोज 98 (Windows 98) , विंडोज एक्स .पी. (Windows XP) , विंडोज व्हीस्टा (Windows Vista), विंडोज 7 (Windows 7), विंडोज 8 (Windows 8), विंडोज 10 (Windows 10) अशा मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या वेगवेगळ्या आवृत्या आहेत.

    व्हायरस - Virus : संगणकीय विषाणू 

    संगणकाच्या कामात अडथळा आणून काम बिघाड निर्माण करणारा प्रोग्राम म्हणजेच व्हायरस. संगणकीय विषाणू ही एक संगणकीय प्रणाली असते जी संगणका मध्ये घुसून संगणकातील सॉफ्टवेअरला हानिकारक संसर्ग पोहवतो ज्यामुळे फाइल नष्ट होऊ शकतात.

    संगणकाचे प्रकार : Types of Computer in Marathi


    Computer Information in Marathi
    Types of Computer information in Marathi


    डेस्कटॉप (Desktop) : 

    घरी, शाळा,ऑफिस सर्व ठिकाणी याचा वापर केला जातो. हा आशा प्रकारे तयार केलेला असतो की टेबलवर ठेवल्या नंतर सहजा सहजी वारंवार इतरत्र घेऊन जाऊ शकत नाही. यामध्ये मॉनिटर, कीबोर्ड, माऊस असे सर्व भाग वेगळे असतात.

    लॅपटॉप (Laptop) : 

    हा बॅटरी पॉवर वर चालणारा संगणक असून व मॉनिटर, कीबोर्ड, माऊस हे एकत्रच असलेने हा आपण सहजपणे बॅग मधून इतरत्र घेऊन जाऊ शकतो.

    टॅब्लेट (Tablet) : 

    याला हॅंडहेल्ड संगणक म्हणून ही ओळखले जाते. हा सहजपणे हातात घेऊन जाऊ शकतो. यामध्ये कीबोर्ड. माऊस नसतात. टच सेन्सेटीव्ह स्क्रीन असते ज्याच्या आधारे टायपिंग केले जाते. नेव्हीगेशनसाठी याचा वापर केला जातो.

    सर्व्हर (Server) : 

    हा देखील एक संगणकाचाच प्रकार असून यामध्ये माहितीची देवाण घेवाण केली जाते. आपण इंटरनेट वर शोधत असलेली माहिती ही या सर्व्हरवरच साठवली जाते.

    Generation : Computer information in Marathi


    Computer Information in Marathi


    Computer Informational in Marathi

    Computers Generation : संगणकाची पिढी

    1. First Generation : 1940 च्या सुरवातीस संगणकाची पहिली पिढी वैक्युम ट्यूब लॉजिक सर्किट वापरुन तयार केली होती. या संगणकाचे स्पीड मिलि सेकंद मध्ये मोजले जात होते.

    2. Second Generation : 1959- 64 या काळात दुसर्‍या पिढीच्या संगणकाची सुरवात झाली जे ट्रांजिस्टर च्या सहाय्याने तयार केले होते. या संगणकाचे स्पीड मायक्रो सेकंद मध्ये मोजले जात होते.

    3. Third Generation : 1965-70 या काळात तिसर्‍या पिढीच्या संगणकाची सुरवात झाली जे I.C. च्या सहाय्याने तयार केले होते. या संगणकाचे स्पीड नॅनो सेकंद मध्ये मोजले जात होते.

    4. Fourth Generation : 1971 या काळात तिसर्‍या पिढीच्या संगणकाची सुरवात झाली जे L.S.I.C.च्या सहाय्याने तयार केले होते. या संगणकाचे स्पीड पिको सेकंद मध्ये मोजले जात होते.

    5. Microcomputer : हे संगणक third generation मध्ये तयार झाले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती गोळा करणे, प्रक्रिया करणे, साठवून ठेवणे व त्याचा हवा असलेला रिजल्ट दर्शवण्याची क्षमता आहे. Intel या कंपनीने 1972 मध्ये पहिला microcomputer तयार केला होता. हा वैयक्तिक संगणक 1977 साली बाजारात आला व 1980 च्या दशकात सर्वसामान्य ग्राहकाला परवडेल असा झाला 

    FAQ :

    1. संगणक म्हणजे काय ?

        संगणक एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याला दिलेल्या सूचनांच्या सेटनुसार डेटा प्रक्रिया करण्यासाठी आणि आउटपुट डिव्हाइसवरील कोणत्याही इच्छित स्वरूपात निकाल किंवा आउटपुट प्राप्त करण्यासाठी वापरला जातो.

    2. संगणकाचा डाटा म्हणजे काय ?

    डाटा म्हणजे संख्या, शब्द, मोजमाप, निरीक्षणे अथवा इतर गोष्टींचे वर्णन यांचा संग्रह.

    3. कॉम्युटर चा शोध कोणी लावला ?

    चार्ल्स बँबेज (Charles Babbage) या एका यांत्रिकी अभियंताने पहिल्या कॉम्प्युटरचा शोध लावला .

    4. संगणकाच्या पहिल्या पिढीत काय वापरले होते.

    1940 च्या जवळपास संगणकाच्या पहिल्या पिढीचा काळ होता यावेळी यामध्ये वैक्युम ट्यूबचा मुख्य घटक म्हणून वापर केला गेला होता.

    5. वैयक्तिक संगणक कधी सामान्य झाले ?

    वैयक्तिक संगणक हा microcomputer चीच एक कॅटेगरी होती जो 1977 मध्ये बाजारात आला व 1980 च्या काळात तो ग्राहकांना परवडणारा सामान्य संगणक झाला.

    तर मित्रांनो आपल्याला  हा Computer information in Marathi या लेखातील माहिती नक्कीच उपयोगी पडेल खास करून विद्यार्थ्यांकरिता शालेय शिक्षणात वापर करता येईल असे मला वाटते. तसेच आपल्याला  हा लेख आवडला असेल अशी मी आशा करतो. आपल्याला अशीच Computer, Internet, Online फॉर्म बद्दल माहिती हवी असल्यास आपण मला कमेंट करु शकता. मी त्याबद्दल ही लेख लिहून माहिती देण्याचा प्रयत्न करीन .

    धन्यवाद ! 🙏🙏🙏  जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    हे ही वाचा : 

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.