How to Use Chatgpt - ChatGPT म्हणजे काय ? ChatGPT चा वापर कसा करायचा
ChatGPT Introduction
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्व जगभर भरपूर वेगाने ज्याची चर्चा चालली आहे ती म्हणजे ChatGpt या टुलची. यामुळे आपल्यालाही हे ChatGpt म्हणजे काय आहे (What is ChatGPT), How to Use Chat GPT, ChatGPT Alternative काय, याचा कुणाला किती फायदा आहे व कुणाला किती तोटा आहे याबद्दल नक्कीच उत्सुकता लागली असेल आणि म्हणूनच आज मी हा लेख आपल्या करिता घेऊन आलो आहे ज्यामुळे आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यास नक्कीच मदत होईल. चला तर जाणून घेऊया
How to Use ChatGPT
![]() |
| ChatGPT |
ChatGPT हे कोणी व केंव्हा सुरू झाले ? Open AI ChatGPT
ChatGpt Founder
ChatGPT हे २०१५ साली सॅंम ऑल्टमन व इलॉंन मस्क यांच्या भागीदारीत स्थापन केलेल्या Open AI या कंपनी ने विकसित केलेले Trained मॉडेल आहे. हे November 2022 मध्ये लॉंच झाले आणि बघता बघता याला ५ दिवसात १० लाख यूजरर्संनी रजिस्टर केले. २०१८ साली इलॉंन मस्क हे या कंपनीतून बाहेर पडले व आता फक्त सॅंम ऑल्टमन हे या कंपनीचे प्रमुख आहेत. बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने यामध्ये बरीच गुंतवणूक केली आहे.
ChatGPT म्हणजे काय ? What is Chat GPT
ChatGPT हा एक व्हर्चुयल रोबोट आहे म्हणजेच हे एक trained मॉडेल आहे . ज्यामध्ये २०२१ पूर्वीच्या मागील बर्याच वर्षाचा डेटा भरलेला आहे ज्याच्या सहाय्याने ते तुम्हाला हव्या असलेलया प्रश्नांची उत्तरे देते, माहिती लिहून देण्याचे काम करते, सॉफ्टवेअर करिता लागणारे कोडिंग तयार करते, विद्यार्थ्यांकरिता निबंध तयार करून देते . अशी तुमची बरीच कामे पूर्ण करून देते . हे सर्व तुम्हाला तयार मिळत असल्याने तुम्हाला वेगवेगळ्या वेब साईट वर जाऊन माहिती गोळा करावी लागत नाही.
फायदे :
1. सध्या हे टुल वापरणेकरिता कोणतीही फी आकारलेली नाही यामुळे आपण पुर्णपणे विनामूल्य याचा फायदा घेऊ शकता.
2. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची माहिती तपशीलवार मिळते.
3. तुम्ही गुगल वर सर्च केल्यास तुम्हाला बर्याच साइट ओपन करून माहिती गोळा करावी लागते यामध्ये सर्व माहिती तयार मिळते.
4. तुम्हाला मिळालेली माहिती तुम्हाला पसंत नसल्यास तुम्ही तोच प्रश्न regenerate केल्यास तुम्हाला नवीन माहिती दिली जाते.
5 अगदी कमी वेळात तुम्ही जादा माहिती गोळा करू शकता यामुळे तुमच्या वेळेचीही बचत होते.
6. ChatGPT मुळे विद्यार्थ्यांना निबंध लिहणे,प्रोग्राम कोडिंग करणे, रेज्युम करणे, अर्ज करणे , यूट्यूब करिता स्क्रिप्ट तयार करणे, keyword शोधणे , ब्लॉग करिता लेख लिहणे सोपे झाले आहे.
7. माहिती करिता तुम्ही शब्दाचे लिमिट दिले तर तितक्याच शब्दात तुम्हाला माहिती उपलब्ध करून देईल.
तोटे :
1. यामध्ये 2021पर्यंतचाच डेटा फीड असलेने यानंतरची काही माहिती हवी असेल तर ती आपल्याला मिळू शकणार नाही.
2. सध्या हे इंग्रजी व काही ठराविक भाषेला जास्त सपोर्ट करत आहे. इतर भाषामध्ये अजून हवी तितकी माहिती उपलब्ध होत नाही. जसे अपडेट होत राहील तसे इतर भाषांनाही सपोर्ट मिळत राहील.
3. सध्या संशोधन चालू असलेने विनामूल्य असण्याची शक्यता आहे कदाचित संशोधन पूर्ण झाल्यावर येणार्या काळात फी आकारली जाऊ शकते.
4.शिक्षणक्षेत्रात विद्यार्थ्यांना याचा फायदा दिसत असला तरी विद्यार्थ्यांना माहिती सहज मिळाल्याने त्यांची स्वत:ची बुद्धी वापरुन काम करण्याची प्रवृत्ती कमी होईल ज्याचा त्यांना व्यावहारिक जीवनात तोटा होऊ शकतो. तसेच काहीतरी नवीन शिकण्याची, करण्याची उमेद कमी होईल अशी भीती वाटते.
5. सध्या ते संशोधनाच्या टप्प्यावर असलेने बरीच चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देऊ शकते.
ChatGPT चा फूल फॉर्म : ChatGPT Meaning
Chat Generative Pre-Trained TransformerChatGPT हे कसे काम करते :
ChatGPT हे trained model असलेने तुम्ही जेंव्हा याला एखादा प्रश्न विचारता त्यावेळी हे त्यातील शब्दांच्या आधारे प्रश्नाचा अर्थ समजून घेऊन त्याचाकडे आधी साठवलेल्या माहिती मध्ये त्याचा शोध घेते व ती माहिती तपशीलवार तुम्हाला प्रदर्शित करते.याचा वापर कसा कराल- How to Use ChatGPT
याचा वापर करणेसाठी आपल्याकडे एक ईमेल अकाऊंट असणे गरजेचे आहे.१. सर्व प्रथम google.com ओपन करा
२. यामध्ये ChatGPT असे सर्च करा आपल्या समोर खालील प्रमाणे वेब साइट दिसून येतील.
![]() |
| ChatGPT 1 |
३. यातील पहिलीच open AI नावाची साइट दिसून येईल यावर क्लिक करून ही लिंक ओपन करा.
४. Open AI चे असे पेज ओपन होईल.
५. यातील Try ChatGPT वर क्लिक करा
६. यामध्ये आपल्याला लॉगिन व साइन अप असे दोन पर्याय दिसून येतील.
७. यातील साइन अप वर क्लिक करा
८. खाली दोन पर्याय असतील यातील Continue with Google या पर्यायावर क्लिक करा .
८. खाली दोन पर्याय असतील यातील Continue with Google या पर्यायावर क्लिक करा .
९. तुमचा ई मेल आयडी एंटर करा , तुमचे chatGPT साठी वापरणारे नावं, जन्म तारीख व Mobile नंबर अशी माहिती विचारली जाईल ती एंटर करा.
१०. मोबाइल Verification करिता मोबाइल वर ओटीपी येईल.ओटीपी Verification होऊन तुमचे खाते ओपन होईल.
११. अशा प्रकारे तुमचे लॉगिन झाल्यावर यामध्ये ChaatGPT संबधी काही सूचनेच्या विंडो ओपन होतील त्या सर्व नेक्स्ट करा ChatGPT चे होम पेज दिसून येईल.
१०. मोबाइल Verification करिता मोबाइल वर ओटीपी येईल.ओटीपी Verification होऊन तुमचे खाते ओपन होईल.
११. अशा प्रकारे तुमचे लॉगिन झाल्यावर यामध्ये ChaatGPT संबधी काही सूचनेच्या विंडो ओपन होतील त्या सर्व नेक्स्ट करा ChatGPT चे होम पेज दिसून येईल.
१२. यामध्ये खाली चॅट बॉक्स असेल यामध्ये तुम्ही हवा असलेला प्रश्न टाइप करून एंटर करा.
१३ आता आशा प्रकारे वरील बाजूस तुमच्या प्रश्नाचे उत्तर अथवा जी माहिती विचारली असेल ती तपशीलवार दिसून येईल.
१४. यामध्ये माहिती कॉपी करण्याचा पर्याय असेल . त्यावर क्लिक करून प्रदर्शित झालेली माहिती कॉपी करून तुम्ही हवी तिथे पेस्ट करून वापरू शकता.
१४. यामध्ये माहिती कॉपी करण्याचा पर्याय असेल . त्यावर क्लिक करून प्रदर्शित झालेली माहिती कॉपी करून तुम्ही हवी तिथे पेस्ट करून वापरू शकता.
ChatGPT चा वापर कोठे करू शकता?
1. तुम्ही विद्यार्थी असाल तर निबंध, भाषण लिहून देणे, गणित सोडवून देणे, सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मध्ये कोडिंग करण्यास मदत करणे अशी विविध कामात वापर करू शकता.2. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला एक चांगला रेज्युम तयार करून देणे, ऑफिस उपयुक्त मेल तयार करून देणे, पत्र तयार करणे अशा कामात मदत होऊ शकते.
3. तुम्ही Youtuber अथवा ब्लॉगर असाल तर Keyword शोधून देणे, विडियो करिता Description तयार करून देणे, लेख लिहून देणे अशी कामात मदत होऊ शकते.
जादा पैसे कमवू शकाल : How to Earn Money Online Using ChatGpt
तुम्ही लेख लिहण्याचे काम घेऊन पैसे कमवत असाल तर ChatGpt वरून कमी वेळात माहिती गोळा करून लेख लिहण्याचे काम लवकर पूर्ण करू शकाल यामुळे तुम्हाला जादा कामे हाती घेता येतील ज्यामुळे तुमच्या कमाईत जादा भर पडू शकेल.
Youtube करिता SEO करणेसाठी Ranking Keyword शोधून देऊ शकेल, आकर्षक Title तयार करून देईल, चांगले विडियो Description तयार करून देईल ज्यामुळे तुमची विडियो Rank होण्यास व Views मिळण्यास मदत होईल ज्यामुळे रेविन्यू वाढण्यास मदत होऊ शकते.
गूगलला याचा काय फरक पडेल :
एकंदरीत सध्याचा विचार करता ही प्रणाली अजून संपूर्ण प्रभावशाली नसलेने सर्व माहिती मिळू शकत नाही. गुगल कडे असलेल्या फोटो , विडियो, लेख याचा भरपूर डेटा उपलब्ध आहे ज्यामुळे सध्या ही प्रणाली गूगलला मागे टाकेल असे वाटत नाही.
विद्यार्थी Assignment लिहण्यात याचा उपयोग करत असल्याने अमेरिकेतील काही शहरांनी या प्रणालीवर बंदी आणली आहे.
Conclusion :
आज काल कमी वेळात जादा काम ही माणसाची वृत्ती झाली आहे . ChatGpt ही प्रणाली तंत्रज्ञानातील एक क्रांतिकारक बदल आहे ज्याचा मनुष्याने कमी वेळात जादा काम करण्यासाठी पुढे चांगला उपयोग करून घेतला तर फायदेशीर असेल. परंतु शालेय शिक्षणात याचा चुकीचा वापर होऊन मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे अशा चुकीचा वापर होणार्या गोष्टींवर योग्य पर्याय शोधून काढणे गरजेचे असेल.
FAQ :
1. Can we use ChatGPT for free?
हो, ही प्रणाली सध्या विनामूल्य आहे. कदाचित भविष्यात फी आकारली जाऊ शकते2. What does ChatGPT stand for?
ChatGPT हे एक Intelligent trained Model आहे जे ऑटोमॅटिक चाट करत असते. ज्याचा फूल फॉर्म Chat Generative Pre-Trained Transformer असा आहे.3. How can I access ChatGPT?
ChatGPT चा वापर करणेसाठी तुम्हाला गूगल वर ChatGPT सर्च करून Open AI ची लिंक ओपन करून ईमेल च्या सहाय्याने sign up करून लॉगिन करावे लागेल व त्यामधील चॅट बॉक्सचा वापर करावा लागेल.
4. Can ChatGPT be detected?
हो, AI detecting प्रणालीच्या मदतीने तुम्ही तयार केलली माहिती ही मनुष्याने तयार केली आहे की AI प्रणालीच्या मदतीने केली आहे हे ओळखता येते.
5. Who is the Owner of ChatGPT?
ChatGPT ही प्रणाली Open AI या कंपनीने तयार केली आहे जी 2015 मध्ये सॅंम ऑल्टमन व इलॉंन मस्क यांच्या भागीदारीत स्थापन झाली आहे.
अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा:
तर मित्रांनो How to Use ChatGPT, What is ChatGPT अशा बर्याच प्रश्नांची उत्तरे देऊन ChatGPT बद्दल जास्तीत जास्त माहिती मी तुम्हाला या लेखामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे जी आपल्याला नक्कीच उपयोगी येईल. आपल्या हा लेख कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका .
धन्यवाद ! 🙏🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩
हे ही वाचा : Computer Information in Marathi







