Importance of Artificial Intelligence | कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

What is Artificial Intelligence(AISystem)-आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय ?

Artificial Intelligence - कृत्रिम बुद्धिमत्ता  

मित्रांनो आज काल AI म्हणजेच Artificial Intelligence हा शब्द आपल्याला सारखा कानावर पडत असेल. तर नावावरूनच आपल्याला अंदाज येतो की हे काय असेल. Artificial म्हणजे कृत्रिमIntelligence म्हणजे बुद्धिमत्ता . "कृत्रिम बुद्धिमत्ता" हा आजच्या डिजिटल काळातील मोठा बदल समजला जातो. याचा वापर करून मशीनला माणसाप्रमाणे बुद्धीचा वापर करून निर्णय घेण्याची क्षमता तयार केलेली असते. याच्या वापरामुळे मानवाच्या बर्‍याच गोष्टी Advance होत चालल्या आहेत. सध्या आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण याचा वापर करणारी उदाहरणे म्हणजे Google Maps , Google Lense , Alexa. तर आजच्या लेखामध्ये याच Artificial इंटेलिजेंस बद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहोत.
    Importance of  Artificial Intelligence

    What is Artificial Intelligence : Artificial Intelligence म्हणजे काय?

    Artificial Intelligence Meaning

    Artificial Intelligence हे तंत्रज्ञान Computer Science चीच एक शाखा आहे. यामध्ये मशीन, संगणक प्रणालीद्वारे मनुष्याच्या बुद्धिमत्तेची नक्कल करते जसे मनुष्यासारखे विविध भाषेत बोलणे, आवाज ओळखणे, एकमेकांशी संवाद साधने , वाचू शकणे निर्णय घेणे इत्यादि गोष्टी सहज करू शकते.


    History of Artificial Intelligence: आर्टिफिश्यल इंटेलिजन्स चा इतिहास


    Artificial Intelligence शब्द आपण आज ऐकत असलो तरी संशोधकांच्या डायरीत हा शब्द जुना आहे. हे तंत्रज्ञान आपल्या कल्पनेपेक्षा जुने आहे. Egyptian आणि ग्रीक लोकांच्या जुन्या संस्कृतीमध्ये तांत्रिक पुरुषाचा उल्लेख आढळतो.

    आता खाली आपण Artificial Intelligence च्या इतिहासाबद्दल आणि त्याच्या संशोधांनापासून ते सध्याच्या युगामध्ये त्याचे असलेलले महत्व सांगणारे टप्पे पाहणार आहेत.

    • 1943 साली Warren McCulloch and Walter Pits यांनी AI म्हणून ओळखे जाणारे पहिले कृत्रिम न्यूरॉन्सचे एक प्रोजेक्ट मॉडेल तयार केले.
    • त्यानंतर 1949 मध्ये Donald Hebb यांनी न्यूरॉन्स  कनेक्शन मधील Strength सुधारणा करणारे संशोधन केल ज्याला आता हेबियन लर्निंग असे ओळखले जाते.
    • यानंतर 1950 मध्ये अॅलन ट्यूरिंग जे इंग्लिश गणित तज्ञ होते त्यांनी "Computing Machinery and Intelligence" हे एक प्रकाशन केले ज्यामध्ये एक चाचणी होती जी मशीन ची कार्यक्षमता  तपासू शकते. 
      Importance of  Artificial Intelligence
    • 1956 मध्ये "कृत्रिम बुद्धिमत्ता" हा शब्द प्रथम अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ जॉन मॅककार्थी यांनी डार्टमाउथ परिषदेत स्वीकारला.
    • 1972 मध्ये AI या तंत्रज्ञानाचा वापर करून जपान मध्ये पहिला रोबोट बनविला गेला ज्याला WABOT-1 या नावाने ओळखले गेले. यानंतर काही काळ AI सिस्टमचा प्रभाव कमी होत गेला.
    • 1980 साली Expert System च्या सहाय्याने AI ने पुन्हा प्रगती करण्यास सुरवात केली. 1980 सालीच अमेरिकन असोसिएशन ची Artificial Intelligence ची Stanford University. येथे पहिली कॉन्फ्रेंस झाली. यानंतर AI ची बरीचशी प्रगती होत गेली व आज Google, Facebook, IBM आणि Amazon सारख्या बर्‍याच मोठ्या कंपन्या याचा वापर करून आश्चर्यकारक उत्पादने तयार करत आहेत.
      Importance of  Artificial Intelligence

    Artificial Intelligence ची वैशिष्टे : Features Of Artificial Intelligence

    Artificial Intelligence हे एक संगणक विज्ञानाचेच क्षेत्र आहे जे मशीनच्या विकासावर लक्ष केन्द्रित करते. ज्याला मानवी बुद्धीची आवश्यकता असते. जसे Visual perception- दृश्य धारणा , Speech recognition उच्चार ओळखणे , Decision-making निर्णय घेणे , Language translation भाषांतर करणे अशा वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट केले जाते.

    आपण कॉम्प्युटर वापरत असताना एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला कमांड द्यावी लागते परंतु Artificial Intelligence च्या सहाय्याने तयार केलेल्या मशीनला कमांड द्यावी लागत नाही ते स्वत:च निर्णय घेऊन कमांड देऊन कार्य पूर्ण करत असते.


    How to Use Artificial Intelligence- आर्टिफिशियल कसे वापरले जाते.


    Artificial Intelligence हे विविध उद्योगांमध्ये , क्षेत्रांमध्ये स्वयंचलित कार्ये करण्यासाठी, निर्णय घेण्याची क्षमता सुधारणेसाठी आणि एकूण कार्य क्षमता वाढवण्यासाठी वापर केले  जाऊ शकतो. व्यावसायिक क्षेत्रात, आरोग्य क्षेत्र, कृषिक्षेत्र, शैक्षणिक , आर्थिक, वाहतूक क्षेत्र अशा बर्‍याच क्षेत्रात याचा वापर केला जाऊ शकतो. AI चा वापर करणेसाठी मोठ्या संस्था स्वत:ची AI प्रणाली तयार करतील अथवा विक्रेत्यांकडून उपलब्ध असलेली प्रणालीचा वापर करतील . ती प्रणाली विकसित करणेसाठी व व्यवस्थापन करणेसाठी Data Scientist अथवा AI Experts ची नियुक्ती करू शकतील.

    काही कंपन्यांनी चालक नसलेली कार लॉंच केलेली आहे. ही AI सिस्टम आधारित आहे. यामध्ये ड्रायव्हरची गरज भासत नाही. मशीन स्वत: निर्णय घेऊन गाडीची दिशा, मार्ग ठरवत असते. यामध्ये अद्यावत जीपीएस सिस्टम असते.

    हवामान क्षेत्रात ही हवामानाचा अंदाज घेण्यास या प्रणालीचा चांगला वापर केला जाऊ शकतो.



    Types of Artificial Intelligence- Artificial Intelligence चे प्रकार


        Artificial Intelligence चे त्यांच्या क्षमता आणि कार्यक्षमतेच्या आधारावर विविध प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते. येथे काही सामान्य प्रकार दिले आहेत.

    1. Reactive AI
    2. Limited Memory AI
    3. Theory of Mind AI
    4. Self Aware AI
    5. Machine Learning AI
    6. Deep Learning AI
    7. Natural Language Processing AI
    8. Robotics AI
    Importance of  Artificial Intelligence


    Use in daily life : दैनंदिन व्यवहारातील उपयोग


    Applications of Artificial Intelligence


    कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा आपल्या दैनंदिन जीवनात आपली बरीच कामे सोपी करणेसाठी वापर केला जातो. याची काही उदाहरणे खाली पाहणार आहोत.

    Personal assistants: 

        Siri, Alexa आणि Google Assistant या सारखे AI प्रणालीचे Personal assistants म्हणून आपले रिमाइंडर सेट करणे, अपॉईंटमेंट सेट करणे, प्रश्नांची उत्तरे देणे यासारख्या कामात मदत करत असतात.

    Navigation :

    गूगल मॅप हे नॅविगेशन App रोजच्या व्यवहारात वापरली जाणारी AI प्रणाली आहे.

    Banking : 


    बँकिंग क्षेत्रात Fraud Transaction ओळखण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जातो.

    Customer Services : 


    ग्राहकाला तत्पर सेवा देण्यासाठी AI Powered Chatboat व Virtual Assistance चा वापर ग्राहक सेवे मध्ये केला जातो.

    Health Care : 


    आरोग्य क्षेत्रात रोगाचे निदान करणेसाठी, उपचाराचे योग्य प्लॅनिंग करणेसाठी केला जातो.

    Social Media : 


    AI अलगोरीदम बातम्या फिड करणेसाठी, कंटेंट ची शिफारस करणेसाठी, हानिकारक कंटेंट शोधून काढणे करिता याचा वापर केला जातो.

    Importance of  Artificial Intelligence

    Conclusion :

        Artificial Intelligence हे वेगाने पसरणारे एक नवीन तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये अनेक उद्योग बदलण्याची क्षमता आहे. परंतु नोकरी विषयी ही चिंता करणारी बाब आहे. याकरिता जोखीम कमी करत जास्तीत जास्त फायदेशीर ,पारदर्शक, आणि नैतिक अशी AI प्रणाली निर्माण करणे आवश्यक आहे.

            तर मित्रांनो Artificial Intelligence म्हणजे काय , Importance of  Artificial Intelligence, याचा वापर कोठे केला जातो, आपल्या दैनंदिन जीवनात याचा कसा वापर केला जातो हे आपल्या नक्कीच लक्षात आले असेल. आपले या लेखाबद्दल काही मत असल्यास कमेंट करायला विसरू नका.

    धन्यवाद ! 🙏🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩

    हे ही वाचा :

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.