ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी | Digital Payment Security

ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी - Payment Security


Introduction 


देशात गेल्या काही वर्षात म्हणजेच नोटाबंदी व त्यानंतर कोरोंना महामारी झाले पासून ऑनलाइन व्यवहार करण्याकडे लोकांचा कल वाढत गेला आहे. यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI सिस्टम , क्यूआर कोड स्कॅन अशा बर्‍याच सोयी उपलब्ध झाल्या आहेत. ग्राहकाकडून आपल्या सोयी नुसार हव्या त्या वेळी, हव्या त्या पद्धतीने, बिल पेमेंट करणे , पैसे ट्रान्सफर करणे , ऑनलाइन खरेदी करणे अशा वेगवेगळ्या कारणासाठी ऑनलाइन पेमेंट सिस्टमचा वापर केला जात आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत कोणीही अगदी घरबसल्या मोबाईल अथवा Computer वरुन सहजपणे ऑनलाइन पेमेंट करू शकतो. ही पेमेंट सुविधा सहज व सोपी असली तरी यामध्ये योग्य ती काळजी घेतली नाही तर आर्थिक नुकसान होण्याचा धोका असू शकतो. म्हणूनच आजच्या लेखामध्ये ऑनलाइन पेमेंटच्या कोणत्या कोणत्या सिस्टम आहेत व यामार्फत ऑनलाइन व्यवहार करताना कोणते धोके ऊदभवू शकतात आणि अशा परिस्थितीत आपण काय काळजी घेतली पाहिजे हे समजून घेणार आहे. जेणेकरून ऑनलाइन व्यवहार करताना कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे हे आपल्याला लक्षात येईल व आपण ऑनलाइन व्यवहार सुरक्षित करू शकाल.

    ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी
    Digital Payment

    ऑनलाइन पेमेंट करण्याच्या सुविधा :

    1. डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड Debit Card/ Credit Card : 

            याद्वारे पेमेंट करत असताना कार्ड नंबर, कार्ड Expiry Date, कार्ड होल्डर नेम, व Security Code ही माहिती सबमीट करावी लागते यानंतर तुमच्या बँकेला रजिस्टर असलेल्या तुमच्या  मोबाइलला ओटीपी येतो व तो ओटीपी सबमिट करून व्यवहार पूर्ण केला जातो.

    2. नेट बँकिंग Net Banking  : 

            यामध्ये ग्राहकाला बँकेकडून यूजर आयडी व पासवर्ड दिला जातो ज्याच्या आधारे ग्राहक बँक पोर्टलवर लॉगिन करून आपला व्यवहार पूर्ण करत असतो.

    3. UPI सिस्टम  UPI Payment: 

        याद्वारे पेमेंट करणे करिता मोबाइल वर UPI सिस्टम चे App इंस्टॉल करावे लागते. यामध्ये तुमचा यूपीआय आयडी तयार होत असतो. हा आयडी ग्राहकाला पेमेंट करताना सबमिट करावा लागतो यानंतर ग्राहकाला ते App ओपन करावे लागते या App मध्ये पेमेंट करण्याची एक सूचना येते त्यावर क्लिक करून, पासवर्ड नोंद करून पेमेंट पूर्ण करता येते.

    4. क्यूआर कोड : 

    यामध्ये आपल्याला ज्याला पेमेंट करावयाचे आहे त्याच्याकडे क्यूआर कोड असेल तो कोड आपण मोबाइल वर जे UPI APP इंस्टॉल केले असेल त्या मार्फत स्कॅन करून , रक्कम नोंद करून, पासवर्ड नोंद करून आपला व्यवहार पूर्ण करता येतो.

    Online Payment Security - सुरक्षितता 

    धोके व काळजी :  Tips to Ensure Secure Online Transactions

    Digital payments Security
    Fraud Links

    कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका  

    आपल्या मोबाइलवर अथवा मेलवर आलेल्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून ग्रुप जॉइन करणेसाठी , अथवा पैशाचे आमिष दाखवणारी कोणतीही लिंक आली असेल तर अशा आलेल्या लिंक वर क्लिक करू नका. ओळखीच्या कोणत्याही व्यकतीने केलेल्या मेसेज मध्ये पेमेंट संबधी लिंक आली असेल तर ती लिंक खरी असल्याची खात्री ज्या व्यक्तीने मेसेज पाठवला आहे त्याच्याशी संपर्क साधून करून घ्या. लिंक मधील स्पेलिंग व्यवस्थित चेक करा. काही फसव्या लिंक असतात जसे समजा payment.gov.in ही खरी लिंक आहे तर या ऐवजी payments.gov.in , payment.gav.in अथवा payment.gou.in अशा प्रकारे एखादे अक्षर मध्ये बदल करून लिंक पाठवली जाते व आपली फसगत होऊ शकते. याकरिता आलेल्या लिंकवर क्लिक करून ओपन न करता आपल्या ब्राऊजर मध्ये लिंक टाइप करा म्हणजे टाइप करत असताना आपल्याला स्पेलिंग मधील फसगत लक्षात येऊ शकते .

    Digital payments Security
    Fraud Phone Calls

    फोनवरून कोणतीही माहिती शेअर करू नका 

    आजकाल आपले वीज बिल जमा न झालेने आपला वीजपुरवठा आज रात्री पासून खंडित होणार आहे तरी तो खंडित होऊ द्यायचा नसेल तर या  नंबरवर संपर्क साधा अशा प्रकारे किंवा तुमचे डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड ब्लॉक होणार आहे हे होऊ न देणे करिता त्वरित खालील लिंक वर क्लिक करा किंवा दिलेल्या मोबाइल नंबरशी संपर्क साधा असे फसवे मेसेज येत असतात अशा वेळी आपण घाबरून गडबडीत त्या लिंक वर क्लिक करून अथवा त्या नंबरशी संपर्क साधून पेमेंट करतो किंवा आपली बँक माहिती, आधार कार्ड , पॅन कार्डची माहिती  देत असतो व याचा फायदा घेऊन आपले बँक खातेतील रक्कम काढली जाते याकरिता अशा कोणत्याही मेसेजला उत्तर न देता आपण नजीकच्या संबधित बँकेत अथवा कार्यालयात संपर्क साधून खात्री करून घ्या.

    खोट्या मेसेज अथवा फोनला बळी पडू नका 

    बरेच वेळा कोणताही मेसेज न पाठवता बँकेचे अधिकारी बोलत असल्याचे भासवून आपल्याकडून पॅन कार्ड, आधार कार्ड , डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड , Security पिन , तुमच्या मोबाइल वर आलेला ओटीपी याची माहिती घेतली जाते व परस्पर तुमच्या बँक खात्यातून रक्कम काढली जाते अशा वेळी फोनवर कोणतीही माहिती न देता आपल्या बँकेत समक्ष जाऊन खात्री करून घ्यावी.

    Digital payments Security
    Password Security

    पासवर्ड सुरक्षित ठेवा 

    बरेच जण पासवर्ड, पिन नंबर लक्षात राहणेसाठी नावं , मोबाइल नंबर, गाडीचा नंबर, जन्म तारीख असे ठेवत असतात याचा वापर शक्यतो टाळा पासवर्ड मध्ये कॅपिटल लेटर , स्मॉल लेटर , एखादे चिन्ह व नंबर यांचा एकत्र वापर करून पासवर्ड तयार करावा म्हणजे तो इतरांना सहजा सहजी लक्षात येणार नाही. काही जण आपला पासवर्ड मोबाइल मध्ये सेव्ह करू ठेवत असतात असेही करू नका. जर सेव्ह केलाच तर अर्धवट म्हणजेच पासवर्ड मधील काही अक्षरे जी आपल्या लक्षात राहु शकतात ती मोबाइल मध्ये सेव्ह करू नका व इतर अक्षरे सेव्ह करून ठेवा .जसे समझा you#3456 हा तुमचा पासवर्ड आहे तर यातील y#345 असा अर्धा पासवर्ड मोबाइल मध्ये सेव्ह करून ठेवा जेणेकरून इतर कुणाच्या हाती मोबाइल मधील डेटा मिळाला तर त्यांना पासवर्ड समजणार नाही.

    Digital payments Security
    QR Scan

    आमिषाला बळी पडू नका 

             क्यूआर कोडचा वापर कधीही पेमेंट घेण्यासाठी केला जात नाही याचा वापर फक्त आपण दुसर्‍या व्यक्तिला पेमेंट करणेसाठी केला जातो यामुळे तुम्हाला कधी कोणी काही पैशाचे, लॉटरीचे आमिष दाखवून पेमेंट तुमच्या खात्यावर जमा करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करण्यास संगितले तर सावधान अशी चूक करू नका आपल्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी आपल्याला कधीही क्यूआर कोड स्कॅन करावा लागत नाही. 

    मोबाइलवर App इंस्टॉल करताना सावधान 

    मोबाइलवर कोणतेही App इंस्टॉल करताना सावधगिरी बाळगा App  मध्ये Permission यस करण्यापूर्वी आपण इंस्टॉल करत असलेल्या App ला खरोखरच याची गरज आहे काय हे पहा जसे आपण एखादे व्हिडिओ संबधित App इंस्टॉल करत आहात व त्यामध्ये कॉनटॅक्ट ,मेसेज, लोकेशन हाताळण्याची परवानगी मागत असेल तर देऊ नका असे App धोकादायक असू शकते . App इंस्टॉल करताना ते Official प्ले स्टोर वरूनच करा.

    सार्वजनिक नेटवर्कचा वापर टाळा 

    आपण बाहेर ठिकाणी गेल्यानंतर तिथे असलेल्या सार्वजनिक wifi अथवा केबल नेटवर्कचा वापर करत असतो. हा वापर करणे शक्यतो टाळा. ते नेटवर्क सुरक्षित नसल्यास तुमच्या डिव्हाईस वरील डेटाला धोका निर्माण होऊ शकतो. या करिता सार्वजनिक नेटवर्क शक्यतो टाळा. 

    सोशल मिडियावर काळजी घ्या 

    फेसबूक, Instagram ,Whatsapp यासारख्या कोणत्याही सोशल मीडियावरून ओळख झालेल्या व्यक्तीशी अथवा अशा सोशल मीडिया वर आपली कोणतीही गुप्त माहिती शेअर करू नका . आपण बाहेगावी गेला असाल तर वेळोवेळी फोटो शेअर करून आपण घरापासून बाहेर आहात याची माहिती सोशल मीडिया वर शेअर करू नका याचा गैरफायदा ही घेतला जाऊ शकतो .

    कार्ड डीटेल सुरक्षित ठेवा 

    डेबिट कार्डचा वापर करून एटीएम मधून पैसे काढत असताना आपल्या जवळपास कोणी नाही ना याची खात्री करा जेणेकरून आपण पासवर्ड टाइप करत असताना इतरांना समजणार नाही. आपले कार्ड इतर कोणत्याही व्यक्तीकडे देऊ नका. कार्ड सुरक्षित ठेवा. संपूर्ण व्यवहार पूर्ण झालेशिवाय एटीएम मधून बाहेर पडू नका. कार्ड डीटेल कोठेही सेव्ह करून ठेवू नका. 

    ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी


    तक्रार नोंद करा :

     समजा आपली ऑनलाइन व्यवहारात फसवणूक झाली तर फसवणूक झाल्याचे समजताच ताबडतोब www.cybercrime.gov.in या पोर्टलवर जाऊन तक्रार नोंद करू शकता. 

    Conclusion : 

    एकंदरीत ऑनलाइन व्यवहार करत असताना व्यवहाराची माहिती ही गुप्त ठेवली पाहिजे. व्यवहारात वापरात येणारे कार्ड, पासवर्ड, गुप्त कोड, ओटीपी ची माहीती कोणत्याही बाहेरील, अनोळखी. विश्वास नसलेल्या व्यक्तीकडे फोनवर अथवा समक्ष देऊ नका, कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, आमिषाला बळी पडू नका. असे सुरक्षित व्यवहार केला तरच  आर्थिक नुकसान होणेपासून आपण सुरक्षित राहू शकता. 

    FAQ : 

    1. ऑनलाइन व्यवहार करताना काय खबरदारी घ्यावी?

    आपण पेमेंट करिता वापरत असलेल्या मोबाइल अथवा कॉम्प्युटर वर सुरक्षित Antivirus इंस्टॉल करा. डिव्हाईसचा पासवर्ड स्ट्रॉंग ठेवा. 

    2. ऑनलाइन व्यवहार करताना कोणती कृती टाळावी. 

    अनोळखी अथवा सार्वजनिक Wifi नेटवर्कचा वापर टाळावा. आर्थिक व्यवहारातील माहिती शेअर करू नका.

    3. डिजिटल पेमेंटचे भविष्य काय आहे ? 

    सध्याचे ऑनलाइन व्यवहाराचा लोकांचा वापर पहाता येणार्‍या काही वर्षात २०० ते ३०० टक्के डिजिटल व्यवहारात वाढ होण्याची शक्यता आहे. डिजिटल व्यवहाराची वाढ ही प्रभावशाली आहे. 

    ४. डिजिटल पेमेंट कधी सुरू करण्यात आले. 

    २२ नोव्हेंबर २०१० मध्ये NPCI (National Payment Corporation of India) या कंपनीने IMPS ही तात्काळ पेमेंट सेवा सुरू केली. 

    ५. UPI चा शोध कोणी लावला ?

    UPI हे National Payment Corporation of India (NPCI ) या कंपनीने विकसित केले. 

    ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी

    तर मित्रांनो जितकी शक्य तितकी ऑनलाइन पेमेंट मधील धोके व सुरक्षितता याबाद्दल माहिती मी या लेखामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे तुम्ही तुमचे ऑनलाइन आर्थिक व्यवहार सुरक्षित कराल व आर्थिक नुकसान टाळू शकाल. आपल्या हा लेख कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका.

    धन्यवाद ! 🙏🙏flag जय महाराष्ट्र 🚩🚩

    हे ही वाचा : 

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.