प्रॉम्प्ट चा वापर कसा करावा
Prompt ही एक अशी शक्ती आहे जिचा योग्य वापर केला तरच आपल्याला हवी असलेली माहिती अथवा प्रश्नाचे अपेक्षित व अर्थपूर्ण उत्तर आपण chatGPT / AI कडून मिळवू शकतो.
Prompt चा योग्य वापर करून बर्याच व्यक्ति ChatGPT ला आपल्यासाठी काम करणारा “Digital Assistant” बनवतात!
Prompt म्हणजे काय?
Prompt = Information + Instruction + Expectation
आपल्याला हवी असणारी एखादी विशिष्ट माहिती, इमेज, छोटा मजकूर, अथवा प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी ChatGPT ला आपण जी काही माहिती (Information) सांगतो, प्रश्न विचारतो अथवा आदेश देतो (Instruction) आणि आउटपुट कसं दिसायला हवं याची अपेक्षा (Expectation) सांगतो त्या प्रत्येक गोष्टीला “Prompt” म्हणतात. हा प्रॉम्प्ट दोन शब्दांचा, एका वाक्याचा अथवा मोठा परिच्छेद ही असू शकतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ChatGPT कडून म्हणजेच AI कडून अपेक्षित उत्तर मिळवण्यासाठी आपण जे इनपुट देतो त्याला प्रॉम्प्ट म्हणतात.
उदाहरणार्थ :
“माझे मराठी प्रेरणादायी व्हीडिओचे यूट्यूब चॅनल आहे (Information). या यूट्यूब चॅनल करिता 30-40 वयोगटाच्या प्रेक्षकांसाठी 1 मिनिटाची मोटिवेशनल स्क्रिप्ट लिहा (Instruction). सोप्या मराठीत 8 ते 10 मिनिटाची असावी. शेवटी एक प्रेरणादायी संदेश असावा (Expectation).”
हा एक Complete Prompt आहे.
ChatGPT / AI प्रॉम्प्ट कसा समजतो ?
मित्रांनो ChatGPT /AI तुमच्या प्रॉम्प्टमधील प्रत्येक शब्द आणि शब्द वाचतो, भाषा ओळखण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही काय प्रश्न विचारत आहात हे समजून घेतो, कशा प्रकारचे उत्तर हवे आहे ती अपेक्षा ओळखण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर त्याने यापूर्वी शिकलेल्या खूप मोठ्या मजकुरातील पॅटर्न वापरुन तुमच्या प्रश्नाशी जुळणारी माहिती आठवतो व पुढचा योग्य शब्द कोणता असावा याचा अंदाज लावतो आणि पूर्ण उत्तर तयार करतो. तो माणसा सारखा विचार करत नाही पण भाषेचे पॅटर्न खूप चांगले ओळखतो. म्हणूनच प्रॉम्प्ट जितका स्पष्ट असेल, संदर्भ जितका उत्तम असेल तितके चांगले उत्तर तुम्हाला मिळेल.
Prompt कसे लिहिलं तर ChatGPT expert सारखं output देतो?
उदाहरणार्थ जर तुम्ही
“Story लिहा.” असा प्रॉम्प्ट लिहला तर हा साधा प्रॉम्प्ट होईल यामध्ये काही माहिती (इन्फॉर्मेशन) अथवा अपेक्षा (Expectation) नसेल. याठिकाणी ChatGPT तुम्हाला स्टोरी लिहून देईल पण ती तुम्हाला अपेक्षीत असणारी स्टोरी असणार नाही
त्या ऐवजी जर आपण
“ माझ्या यूट्यूब चॅनलच्या शॉर्ट व्हिडिओ करीता 30 ते 40 वयोगटातील प्रेक्षकांसाठी योग्य, emotional tone असणारी, 600 शब्दांची मराठी, प्रेरणादायी कथा लिहून द्या शेवटी उत्तम प्रेरणादायी message असावा”
असा जर प्रॉम्प्ट लिहला अथवा यामध्ये तुम्हाला अजून काही अपेक्षीत असेल त्याचे योग्य स्पष्टीकरण दिले तर ChatGPT तुम्हाला अपेक्षीत अशी एक चांगली कथा लिहून देईल. तुम्हाला जे हव ते तुम्ही जितक्या अधिकपणे स्पष्ट कराल तितकी अधिक चांगली माहिती अथवा उत्तर ChatGPT तुम्हाला देईल.
प्रॉम्प्ट चे मुख्य ७ प्रकार
1. माहिती विचारणारे प्रॉम्प्ट (Informational Prompt )
जेव्हा आपल्याला एखाद्या विषयाबद्दल थेट माहिती हवी असते तेंव्हा हा प्रॉम्प्ट वापरला जातो यामध्ये जास्त विश्लेषण नसते.
2. भूमिका देणारे Prompt (Role Based Prompt )
आपण ChatGPT ला एखाद्या भूमिकेत राहून जसे तू शिक्षक आहेस, डॉक्टर आहेस किंवा तू मार्गदर्शक आहेस अशा एखाद्या व्यक्तीच्या भूमिकेतून उत्तर द्यायला सांगतो त्याला भूमिका देणारे म्हणजेच Role Based प्रॉम्प्ट म्हणतात.
3. उदाहरणांसह मागणारे प्रॉम्प्ट (Example-based Prompt)
आपल्याला जेंव्हा एखादी व्याख्या अथवा माहिती समजण्याकरिता ChatGPT कडून उदाहारणासह माहिती हवी असते तेंव्हा हा प्रॉम्प्ट वापरला जातो.
4. तुलना करणारे प्रॉम्प्ट (Comparative Prompt)
दोन गोष्टीमधील तुलना किंवा फरक समजून घ्यायचा असतो तेंव्हा हा प्रॉम्प्ट वापरला जातो.
5. सर्जनशील प्रॉम्प्ट (Creative Prompt)
यामध्ये ChatGPT ला त्याच्या कल्पनाशक्तीचा वापर करून कल्पक शब्द, भावना आणि शैली वापरुन कथा, कविता अथवा इतर माहिती घेतली जाते.
6. समस्या सोडवणारे प्रॉम्प्ट (Problem-solving Prompt)
यामध्ये आपल्याला काही समस्या, अडचणीवर उपाय हवा असेल तर आपण आपली समस्या सांगतो व ChatGPT त्यावर उपाय सांगतो.
7. संवादात्मक प्रॉम्प्ट (Conversational Prompt)
यामध्ये ChatGPT तुमच्याशी मित्रासारखा गप्पा मारतो. आपण मित्राशी जसा संवाद साधतो तसा तो ही आपल्याशी संवाद करतो.
सर्वात प्रभावी Prompt Writing Formula
A.C.E. Prompt Formula
A – Aim (उद्दिष्ट काय?) म्हणजे तुम्हाला माहीती हवी आहे ती कोणत्या कारणासाठी हवी आहे जसे यूट्यूब व्हिडिओ करीता, शिक्षणाकरिता, व्यवसायाकरिता ते उद्दीष्ट प्रथम लिहणे यानंतर
C – Context (पार्श्वभूमी /संदर्भ /पुरक माहिती) जसे ४० ते ५० वय प्रेक्षकाकरिता, इयत्ता ८ वी साठी, कपड्याच्या व्यवसायासाठी अशा प्रकारे संदर्भ देणे यानंतर
E – Expectation (Output कसा हवा?) म्हणजे माहिती कोणत्या फॉरमॅट मध्ये हवी, ३००/ ५०० / १००० शब्द, ५ मिनिटे, भाषा कोणती हवी , इतर काही आयडिया असतील तर देणे अशा प्रकारच्या अपेक्षा सांगणे
हा framework वापरला तर ChatGPT 90% वेळा perfect output देतो.
Prompt लिहिताना होणाऱ्या महत्वाच्या 7 चुका
२) Context (संदर्भ) न देणे
३) अस्पष्ट Output मागणे
४) एकाच Prompt मध्ये खूप मागण्या करणे
५) Format न सांगणे
६) Time, Tone, Style न सांगणे
७) Example न देणे
अशा प्रकारच्या चुका जर केला तर तुम्हाला योग्य माहिती मिळणे कठीण जाते.
मित्रांनो, Prompt ही ChatGPT ची चावी आहे.
Prompt जसे सुधारत जाल, आपला अनुभव वाढत जाईल तसे ChatGPT तुमच्यासाठी काम करणारा Best Digital Assistant होतो.
FAQ :
प्रश्न .१. प्रॉम्प्ट म्हणजे काय ?
ChatGPT / AI कडून अपेक्षित माहिती मिळवण्याकरिता ChatGPT / AI ला प्रश्नाच्या स्वरुपात अथवा माहितीच्या स्वरुपातील इनपुट केलेला डाटा म्हणजे प्रॉम्प्ट होय.
प्रश्न २ . प्रॉम्प्ट लिहताना कोणत्या गोष्टी लिहाव्यात ?
प्रॉम्प्ट लिहताना तुम्हाला हव्या असणार्या महितीचा संदर्भ स्पष्ट असावा. शब्दांचा गोंधळ नसावा. उद्दीष्ट लिहावे आणि माहिती कशा स्वरुपात असावी ती अपेक्षा लिहावी.
प्रश्न ३. प्रॉम्प्ट लिहताना कोणती काळजी घ्यावी ?
प्रॉम्प्ट मध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे ते स्पष्ट लिहावे. समजण्यास सोपी स्पष्ट भाषा वापरा. अस्पष्टता टाळावी. संदर्भ अधिक वर्णनात्मक आणि तपशीलवार असावा. आउटपुट कसा हवा ती मागणी स्पष्ट लिहावी. एकाच प्रॉम्प्ट मध्ये अधिक मागण्या करू नका.
🔆🔆🔆🔆🔆
धन्यवाद ! जय महाराष्ट्र !
How to Use ChatGPT- ChatGPT चा वापर व त्याचे फायदे
ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी | Digital Payment Security
How to Validate Digital Signature | आधार कार्ड मधील Digital Sign
Gateway in Networking | गेटवे संगणक नेटवर्क मधील महत्वाचा पूल
What is Cryptocurrency in Marathi | क्रिप्टोकरन्सी सुरक्षित आहे काय



