प्रस्तावना
विज्ञान हे मानवाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली साधन असल्याचे स्पष्ट आहे. मानवी जीवनात विज्ञानाचा प्रभाव साध्या मोबाईल फोनपासून ते अवकाश मोहिमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी जाणवतो. भारतासारख्या प्रगतशील देशात विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विकासाचे मुख्य आधारस्तंभ ठरले आहेत. अशा या विज्ञानाच्या महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी आणि भारतीय वैज्ञानिकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी National Science Day साजरा केला जातो.
हा दिवस आपल्याला एका ऐतिहासिक शोधाची आठवण तर करून देतोच पण त्याच बरोबर समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा संदेश देतो. महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांच्या “Raman Effect” या क्रांतिकारी शोधामुळे भारताला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आणि विज्ञान क्षेत्रात नवे दालन उघडले गेले. National Science Day च्या निमित्ताने सी व्ही रामन त्यांच्या कार्याचा सन्मान तर केला जातोच, पण त्याचबरोबर भावी पिढीला संशोधन, नवकल्पना आणि वैज्ञानिक विचारसरणीकडे प्रेरित करणारा प्रेरणादायी दिवस देखील आहे.
National Science Day केव्हा साजरा केला जातो?
भारतामध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस National Science Day म्हणून साजरा केला जातो. भारतीय विज्ञान क्षेत्रातील ऐतिहासिक शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी ‘Raman Effect’ चा शोध जाहीर केला होता. या क्रांतिकारी संशोधनामुळे भारताला जागतिक पातळीवर वैज्ञानिक मान्यता मिळाली. 28 फेब्रुवारी हा केवळ एक स्मरणदिन नसून भारतीय विज्ञानाचा गौरव करण्याचा दिवस मानला जातो. शाळा, महाविद्यालये, संशोधन संस्था आणि विज्ञान केंद्रांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.
National Science Day ची सुरुवात केव्हा झाली आणि कारण काय?
National Council for Science and Technology Communication (NCSTC) या संस्थेने 1987 साली भारत सरकारकडे २८ फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून घोषित करण्याची शिफारस केली आणि त्यानुसार भारत सरकारने हा प्रस्ताव मान्य करून १९८७ पासून दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस National Science Day साजरा करण्यास अधिकृत सुरुवात केली. भारतीय युवकांमध्ये विज्ञानाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि संशोधनाची प्रेरणा देणे हे यामागील मुख्य कारण . रामन यांच्या शोधामुळे भारताला १९३० साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते, याचा अभिमानही या दिवशी व्यक्त केला जातो.
हा दिवस सुरू करण्यामागील उद्देश काय?
समाजात असलेल्या चुकीच्या समजुती, गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवून समाजात वैज्ञानिक विचारसरणी रुजवणे हा National Science Day साजरा करण्यामागील महत्त्वाचा हेतू आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड जागृत करून त्यांच्यातील नवनवीन कल्पनांना प्रोत्साहन देणे हा देखील उद्देश आहे. हा दिवस साजरा केल्याने भारताने तंत्रज्ञान, अवकाश, वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीची जाणीव नागरिकांना देखील होत असते. विज्ञान हे फक्त प्रयोगशाळेपुरते मर्यादित नसून ते आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हे पटवून देणे हा या दिवसाचा केंद्रबिंदू आहे.
National Science Day चे फायदे
या दिवशी वेगवेगळ्या स्पर्धा, व्याख्याने , विज्ञान प्रदर्शन आणि प्रयोग यांचे आयोजन केले जाते यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाबद्दल आकर्षण वाढते आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळते. वैज्ञानिक आणि संशोधन संस्था यांनी केलेले कार्य समाजापर्यंत पोहोचते. विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन करिअर संधींबद्दल माहिती मिळते. याचबरोबर नवउद्योजकांना (Startups) वैज्ञानिक नवकल्पना सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होते. यामुळे देशाच्या विकासात विज्ञानाचे योगदान अधिक मजबूत होते.
सी. व्ही. रामन यांचा सहभाग
सी. व्ही. रामन हे भारतातील एक महान भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी प्रकाशाच्या विखुरण्याविषयी (Scattering of Light) संशोधन करताना ‘Raman Effect’ हा महत्त्वपूर्ण शोध लावला. रामन यांनी केलेल्या संशोधनामुळे १९३० साली त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आणि ते विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय ठरले. रामन यांच्या संशोधनामुळे भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. भारतीय युवकांमध्ये विज्ञानाची प्रेरणा निर्माण झाली. National Science Day हा त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे.
Raman Effect म्हणजे काय?
म्हणजे प्रकाश एखाद्या पदार्थावर पडल्यावर त्यातील काही किरणांचे Wavelength म्हणजेच तरंगलांबी बदलणे यालाच ‘Raman Effect’ म्हणतात. जेव्हा प्रकाश एखाद्या पारदर्शक (द्रव, घन किंवा वायू ) पदार्थातून जातो, तेव्हा त्यातील काही किरणांची तरंगलांबी मध्ये बदल होतो या बदलामुळे प्रकाशाचा रंग किंवा स्पेक्ट्रम वेगळा दिसतो. हा परिणाम २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रथम जाहीर करण्यात आला. Raman Effect चा उपयोग आज रसायनशास्त्र, वैद्यकीय क्षेत्र, औषधनिर्मिती आणि पदार्थ विज्ञानात मोठ्या प्रमाणात केला जातो. या शोधामुळे पदार्थांची रचना आणि गुणधर्म ओळखणे अधिक सोपे झाले.
हा दिवस कसा साजरा केला जातो?
राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विज्ञान प्रदर्शन, मेळाव्यांचे आयोजन करून त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून विविध वैज्ञानिक मॉडेल्स आणि प्रयोग सादर केले जातात तसेच विज्ञान विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतल्या जातात. काही ठिकाणी वैज्ञानिक व्याख्याने, चर्चासत्रे यांचे आयोजन केले जाते. या दिवसाच्या निमित्ताने विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कारही दिले जातात.
हे जाणून घ्या : 5 G Technology in Indiaकोठे कोठे साजरा केला जातो?
National Science Day हा संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, संशोधन संस्था आणि विज्ञान केंद्रांमध्ये विविध कार्यक्रम करून साजरा केला जातो.देशभर विज्ञानाचा संदेश पोहचविण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागातही विज्ञान जनजागृती मोहिमा राबवल्या जातात. ISRO आणि DRDO यांसारख्या राष्ट्रीय संस्थांमध्येही विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. विज्ञान संग्रहालये आणि प्लॅनेटोरियममध्ये विशेष प्रदर्शन भरवले जाते.
दरवर्षी National Science Day साठी एक विशिष्ट थीम (Theme) जाहीर केली जाते. त्या थीमनुसार कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी भारत सरकार तर्फे National Science Communication Awards प्रदान केला जातो. राष्ट्रीय विकासामध्ये विज्ञानाचे योगदान अधोरेखित करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दृष्टीने हा दिवस प्रेरणादायी ठरतो. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस नवीन कल्पना आणि संशोधनासाठी प्रेरणा देणारा ठरतो.
हे ही वाचा : ChatGPT म्हणजे काय?
सारांश :
National Science Day हा केवळ एक स्मरणदिन नसून विज्ञानाच्या शक्तीची जाणीव करून देणारा प्रेरणादायी दिवस आहे. भारताच्या वैज्ञानिक वारसाचा अभिमान बाळगत, नव्या पिढीला संशोधन आणि नवकल्पनांच्या दिशेने प्रेरित करणे हीच या दिवसाची खरी ओळख आहेहे ही वाचा : ChatGPT म्हणजे काय?
FAQ (Frequently Asked Questions)
1) National Science Day भारतात केव्हा साजरा केला जातो?
28 फेब्रुवारी रोजी भारतामध्ये National Science Day साजरा केला जातो.
2) National Science Day साजरा करण्याची सुरुवात केव्हा झाली?
1987 साली भारत सरकारने 28 फेब्रुवारी हा दिवस अधिकृतपणे National Science Day म्हणून घोषित केला आणि तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
3) Raman Effect म्हणजे काय?
प्रकाश एखाद्या पारदर्शक ( द्रव, घन, वायू) पदार्थातून जाताना त्याच्या काही किरणांची तरंगलांबी बदलणे म्हणजेच Raman Effect होय.
4) National Science Day का साजरा केला जातो?
भारतीय वैज्ञानिकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो तसेच विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरित करणे आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे हा देखील उद्देश असतो.
5) National Science Day कसा साजरा केला जातो?
शाळा, महाविद्यालये आणि संशोधन संस्थांमध्ये विज्ञान प्रदर्शन, व्याख्याने, प्रश्नमंजुषा, प्रयोग सादरीकरण आणि विज्ञान मेळावे आयोजित करून हा दिवस साजरा केला जातो.


