Birthday Wishes For Brother In Marathi - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ मराठी🎂
मित्रांनो भाऊ- बहीण असो की भाऊ-भाऊ असोत नाते इतके घट्ट असते की कितीही भांडण झाले तरी मनाने ते कधीही एकमेकांशी दूर जाऊ शकत नाहीत. बहिणीची भावावर असणारी माया तर कित्येक सिनेमात आपल्याला पहायला मिळते. बहीण भावाच्या नात्यावरील बरीच गाणी प्रसिद्ध झाली आहेत. मोठा भाऊ असेल तर मोठ्या भावाने आपली घेतलेली काळजी , आपल्याला दिलेली साथ व जर भाऊ लहान असेल तर त्याने केलेल्या खोड्या , त्याचे केलले लाड अशा अनेक आठवणी भावाशी जोडलेल्या असतात त्यामुळे अशा लाडक्या भावाचा वाढदिवस साजरा करताना मनातील भावना शब्दरूपात मांडून भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता आपल्यासाठी हे खास शुभेच्छा संदेश जे आपण जरी भावापासून दूर असला तरी हे संदेश पाठवून त्याचा वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करू शकाल.
Marathi Birthday Wishes
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Wishes In Marathi For Brother या सदराखाली आपल्याला बरेच वेगवेगळे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चे छान संदेश टेक्स्ट व फोटो स्वरुपात तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. जे तुम्ही सहज कॉपी पेस्ट/ डाऊनलोड करून आपल्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवू शकता.
BIRTHDAY WISHES FOR BROTHER IN MARATHI- भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये
![]() |
| Birthday Wishes for Brother |
मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भरकटलेल्या वाटांना
योग्य दिशा देणारा ,
मावळलेल्या दिवसांना
नव्या पहाटेची आशा दाखवणारा
माझा लाडका भाऊ
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂💮
तिमिरातही त्याची साथ असते,
आनंदात ज्याचा कल्ला असतो,
निरपेक्ष आणि अनुभवाची साथ असलेला
ज्याचा सल्ला असतो अशा माझ्या दादास
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
जपूनी नाती प्रेम दिले
परिवारास या पूर्ण तू केले,
पूर्ण होवोत तुझ्या संपूर्ण इच्छा
हीच या वाढदिवशी माझी एक इच्छा !
![]() |
| Birthday Wish in Marathi |
माझ्या प्रिय भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तू नेहमीच माझा खंबीर पाठिंबा
आणि चांगला मित्र आहेस.
मला आशा आहे की हे वर्ष तुझ्यासाठी
सर्व सुख आणि आनंद घेऊन येईल.
आयुष्याच्या सुख दुखच्या
प्रत्येक वळणावर दिशा दाखवणार,
अशा माझ्या भावाची प्रत्येक मनोकामना
पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
येणारा प्रत्येक क्षण आनंदात जावो,
मनात तुझ्या जे जे असेल ते सर्व
तुला मिळो ही सदिच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
वाढदिवसाच्या अनेक हार्दिक मराठी
![]() |
| Marathi Birthday Wishes for Brother |
भाऊ तू माझा आधार आहेस,
माझ्या आयुष्यातील प्रवासातला
तू खरा साथी आहेस,
माझ्यासाठी तू बेस्ट आहेस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्या त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न व्हावे पूर्ण तुझे
याच वाढदिवसाच्या शुभेच्छा !
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद द्विगुणित व्हावा...
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
कितीही रूसलो तरी समजावून सांगितलस,
कितीही चिडलो तरी समजून घेतलस,
पूर्ण केल्या माझ्या सर्व इच्छा,
अशा माझ्या दादास वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !
भरपूर सुख आणि आनंद तुला मिळो,
आजच्या या खास दिवशी तुझ्या आयुष्याला
नवी दिशा मिळो,
दादाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
आजचा दिवस तुमच्या आयुष्याची नवी
सुरवात ठरो, चांगल्या गोष्टी घडोत,
भरपूर आनंद मिळो...
दादास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा
आज वाढदिवस, प्रत्येक क्षण सुखमय व्हावा,
प्रत्येक अडचणीवर मात करण्याची शक्ति
तुला प्राप्त होवो, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
एकटेपणा जाणवतो तेंव्हा
सोबतीला येतो, प्रत्येक दु:खात
माझ्या मदतीला येतो अशा माझ्या
लाडक्या भावास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझ्या आनंदाचा वेल आकाशाला भिडू दे,
आयुष्यात तुझ्या सर्व काही मनासारखे घडू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Read More : Best Friend Birthday Wishes in Marathi
लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज लांब असलो तरी लक्षातआहे
लहानपणीचा प्रत्येक क्षण,
ज्याच्यामुळे माझे बालपण बनले
गोड आठवणींची खाण ,
अशा माझ्या दादास वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा !
वाद आणि भांडण आहेत जरूरी,
भेटणं आणि दूर जाण ही आहे गरजेचं,
वेळ नसला तरी आनंद साजरा करण
आज आहे गरजेचं, भावा वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !
दादा तू माझे प्रेरणास्थान आहेस,
तू परिवाराचा खरा आधार आहेस,
तुझी सर्व मनोकामना पूर्ण होवो ही सदिच्छा....
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Marathi Birthday Wishes
रक्तापेक्षा मनाची नाती घट्ट असतात,
मानलेली असलेली तरी
हृदयात घर करून बसतात,
अशा माझ्या मानलेल्या भावास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
ज्याचा मला अभिमान आहे,
मानपासून आदर आहे असा
माझा लाडका दादास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझे बालपण तुझ्यासारख्या भावाशिवाय
अपूर्ण राहिले असते,
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms
माणसाचे आयुष्य नशीब घडवत,
माझ्या नशिबात मला भाऊ मिळाला
ज्याने माझ आयुष्य सुंदर केल,
अशा माझ्या लाडक्या दादास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
मी आज तुझ्यापासुन दूर असलो तरी,
तुझा आजचा दिवस आनंदात जावो,
पुढील नवीन प्रकल्पांना यश प्राप्त होवो,
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझ्या चेहर्यावर नेहमी असाच उत्साह राहो,
तू पाऊल ठेवशील तिथे आनंद तुझ्यासोबत येवो,
माझ्या लाडक्या भाऊस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
पावलो पावली बरोबर असणारा,
सुख दुखा:त अखंड साथ देणारा
असा माझा लाडका दादा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
नेहमी दुसर्याच्या सुखाचा विचार करणारा,
प्रत्येकाला मदतीस जाणारा,
माझा सोन्यासारखा भाऊ तुला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
उगवता सूर्य आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले आयुष्यात सुगंध देवो,
ईश्वर आपणास नेहमी सुखात ठेवो
ही सदिच्छा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
🌸लहानपणापासून माझ्या सोबत असणारा,
माझ्या मनाची काळजी घेणारा,
माझा प्रत्येक हट्ट पुरवणारा
माझा लाडका दादा तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂
माझ्या दादाची होऊ शकत नाही किंमत,
किंमत करायची नाही कोणाच्यात हिम्मत,
अशा माझ्या वाघासारख्या भावाला
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !🎂
सुगंधी फुलांनी बहरून जावो
तुझे जीवन, सुख समृद्धीनी
उजळून जावे आयुष्य तुझे.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
आपल्याला या शुभेच्छा नक्कीच आवडल्या असतील . अशाच शुभेच्छा व इतर माहितीसाठी पुन्हा भेट द्या 🙏
हे ही वाचा नक्की आवडेल : Best Friend Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा
.webp)









