![]() |
| What is ChatGPT ? |
ChatGPT म्हणजे काय ?
1. Machine Learning
हे मॉडेल इंटरनेट वर असलेल्या प्रचंड प्रमाणातील माहितीवर प्रशिक्षण घेतं. या प्रशिक्षणामध्ये ChatGPT ला भाषेची रचना कशी करावी, शब्दांचा योग्य अर्थ कसा समजून घ्यावा, वाक्यरचना कशी करावी, माहिती कशी लिहावी, प्रश्नांची अपेक्षित उत्तरं कशी द्यावीत हे सगळं शिकवलं जातं.
2. Neural Networks
ही एआय मधील अशी पद्धत आहे जी मानवी मेंदू जसा काम करतो त्यापद्धतीने डेटावर प्रक्रिया करण्यास शिकवते. ChatGPT मध्ये अब्जो Parameters असतात जे मानसिक प्रक्रियेप्रमाणेच Data process करतात.
3. NLP – Natural Language Processing
ChatGPT ला “मानवी भाषा” समजायला हे तंद्रज्ञान मदत करते.
ChatGPT आणि Google Search दोन्हीमध्ये फरक काय ?
![]() |
| ChatGPT काय करू शकते |
ChatGPT काय करू शकतो?
ChatGPT प्रत्येक क्षेत्रात पोहचला आहे. त्याची क्षमता खूप मोठी आहे. आता सामान्य व्यक्तिपासून व्यावसायिक क्षेत्रापर्यंत लाखो लोक वेगवेगळ्या गोष्टींसाठी ChatGPT चा वापर करताना दिसत आहेत.
सोशल मीडिया मध्ये Content Creator याचा खूप चांगला वापर करत आहेत. .
- YouTube Creator व्हिडिओ करिता स्क्रिप्ट तयार करून घेणे, Attractive टाइटल, Description तयार करून घेण्यास मदत होत आहे.
- Blog लिहणे करिता वेगवेगळ्या विषयातील उत्तम दर्जाचे लेख, कथा लिहून देऊ शकतो.
- Facebook, WhatsApp करिता आकर्षक पोस्ट तयार करून देऊ शकतो.
- व्हिडिओ करिता नवनवीन आयडिया देऊ शकतो.
शिक्षण क्षेत्रामध्ये
- विद्यार्थांना गणित , विज्ञान, इतिहास इत्यादि विषयात नोट्स तयार करायला मदत करणे.
- कठीण विषय असतील तर त्याचे सोप्या भाषेत रूपांतर करून देऊ शकतो.
- परीक्षेची तयारी करण्यासाठी MCQ, प्रश्न व उत्तरे, सारांश तयार करणे.
- भाषांतर करून देणे.
Career च्या क्षेत्रात
- नोकर वर्गासाठी सुद्धा याचा खूप फायदा होत आहे.
- जॉब करिता Resume तयार करणे.
- Job interview साठी questions तयार करणे.
- जॉब अॅप्लिकेशन करिता Cover letter तयार करणे
Business
- मार्केटिंगच्या नवनवीन आयडियाज मिळवणे.
- Customer service मध्ये ग्राहकांच्या चौकशीला प्रतिसाद देणे , ग्राहकांना पाठवायचे मेसेजेस, जाहिरात तयार करण्यासाठी वापर केला जातो.
- कमीत कमी वेळात Business Reports तयार करणे.
- Business संबधीत Emails तयार करणे.
- Excel formula करिता मदत घेतली जाते.
Technical
- सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी अगदी कमी वेळात Programming code तयार करणे.
- Bugs fix करणे म्हणजेच एखाद्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम मध्ये काही चूक किंवा समस्या असेल तर ती चूक दुरुस्त करण्यात याचा वापर केला जातो.
- तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी मानवी हस्तक्षेपाने कामे करण्यासाठी Automation Idea मिळवण्यासाठी याची मदत घेतली जाते.
सामान्य लोक कसा वापरू शकतात
- गृहिणी रोजच्या जेवणाकरिता मेनू व रेसिपी करिता मदत घेऊ शकतात.
- घरखर्च कसा सांभाळावा याचे नियोजन करण्याकरिता माहिती मिळवू शकतात.
- मुलांना शिकवण्यासाठी मजेदार उपक्रम शोधू शकतात.
- प्रवासाची योजना तयार करू शकतात.
- अर्ज, नोटिस, भाडे करारपत्र तयार करून देऊ शकतो.
- चांगले चांगले शुभेच्छा संदेश करून देऊ शकतो.
- घरखर्च कसा सांभाळावा याचे नियोजन करण्याकरिता माहिती मिळवू शकतात.
- मुलांना शिकवण्यासाठी मजेदार उपक्रम शोधू शकतात.
- प्रवासाची योजना तयार करू शकतात.
- अर्ज, नोटिस, भाडे करारपत्र तयार करून देऊ शकतो.
- चांगले चांगले शुभेच्छा संदेश करून देऊ शकतो.
ChatGPT चे फायदे व मर्यादा
फायदे
- तुम्ही काहीही विचारलं तरी काही सेकंदांत उत्तर मिळते.
- वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतात.
- तुमचे काम १० पट जलद गतीने होते.
- कोणत्याही विषयावर हा आपल्याला माहिती देऊ शकतो.
- कोणत्याही भाषेमध्ये हा उत्तर देऊ शकतो. मराठीतही उत्तमपणे उत्तर मिळते.
- कठीण विषय अगदी साध्या, आपल्या भाषेत समजावून सांगतो.
मर्यादा :
- रिअल-टाइम डेटा किंवा लाईव्ह न्यूज विषयी माहिती कधी कधी चुकीची मिळू शकते.
- ChatGPT १०० % accurate नसतो
- पर्सनल Sensitive माहिती, बँक डीटेल, पासवर्ड , आधार क्रमांक शेअर करणे सुरक्षित नाही.
- तो तुमच्यासाठी निर्णय घेत नाही, फक्त सूचना देतो अंतिम निर्णय तुम्हीच घ्यायला हवा.
- जास्त अवलंबून राहिलात तर स्वतःची कौशल्ये कमी होऊ शकतात
FAQ: नेहमी विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न १. ChatGPT म्हणजे नक्की काय?
प्रश्न ३. ChatGPT मधील मुख्य तीन तंत्रज्ञान कोणती?
प्रश्न ४. ChatGPT वापरण्याचा फायदा काय?
प्रश्न ५. ChatGPT चा कोणकोणत्या क्षेत्रात वापर केला जातो?
How to Use ChatGPT- ChatGPT चा वापर व त्याचे फायदे
ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी | Digital Payment Security
How to Validate Digital Signature | आधार कार्ड मधील Digital Sign
Gateway in Networking | गेटवे संगणक नेटवर्क मधील महत्वाचा पूल
What is Cryptocurrency in Marathi | क्रिप्टोकरन्सी सुरक्षित आहे काय


