सकारात्मक मराठी सुविचार
माणसाला देवाने दिलेली एक चांगली शक्ति ती म्हणजे विचार करणे. या विचारावरच माणसाचे प्रत्येक कामातील यश दडलेले आहे. तुमचे विचार तुमच्या आचरणात उतरत असतात म्हणूनच तुमचे विचार जितके चांगले तितके तुमचे आचरण चांगले असते. तुमचे विचार,आचरण चांगले असेल तर तुमचे मन सुद्धा शांत राहत असते. मन जितके शांत असेल तितकी तुमची निर्णय क्षमता योग्य व चांगली असते. तुमच्या निर्णय घेण्यावर तुमच्या प्रत्येक कामातील यश अवलंबून असते.
तर मित्रांनो आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्वाचे आपले विचार नेहमी सकारात्मक व प्रेरणादायी असले पाहिजेत. म्हणूनच मी येथे आपल्यासाठी भरपूर सारे सकारात्मक व प्रेरणादायी मराठी सुविचार आणले आहेत असे छान सुविचार ( Suvichar ) वाचून आपले मन नेहमी प्रफुल्लित, उत्साही व आशादायक राहील ज्यामुळे आपला दिवस आनंदात जाईल व दिवसातले प्रत्येक काम यशस्वी होण्यास मदत होईल.
सुविचार
मराठी सुविचार
Suvichar Marathi
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा
कारण गेलेली वेळ परत येत नाही
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.
तुम्ही कधी बरोबर होता
हे कुणाला आठवत नाही,
परंतु तुम्ही कधी चुकलात
हे कुणीही विसरत नाही.
अंधार झाल्यावर स्वत:च्या सावल्या सुद्धा
साथ सोडतात , म्हणून आयुष्याच्या वाटेवर
एकट्याने चालायची हिम्मत ठेवावीच लागते.
पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो,
त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला
यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते.
प्रेम ज्याला मिळत त्याला
कळत नाही,
ज्याला कळत त्याला
मिळत नाही ...!
आयुष्यात काही लोक असतात
आपण त्यांच्यावर फक्त प्रेम करू शकतो
त्यांना मिळवू शकत नाही
👍सुविचार मराठी - Suvichar Marathi 👌
खर प्रेम ते असत ज्यामध्ये तुम्ही
तुमच्या सुखापेक्षा प्रेमाच्या व्यक्तीच्या
सुखाचा विचार करता ...
अपेक्षा कारण चुकीच नसतं
चुकीच असत ते
चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करण.
अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे
माणसाचा स्वभाव,
ते जेंव्हा प्रयत्न सोडतात तेंव्हा आपण यशाच्या किती
जवळ आहोत याची कल्पना नसते
खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण यशाच्या जवळ आलो आहे.
लोक त्यांचे कर्तव्य विसरतात,
परंतु त्यांचे हक्क लक्षात ठेवतात.
प्रत्येक मिनिटाला जग बदलण्याची संधी आहे.
तुमच्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात,
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
सुंदर सुविचार मराठी
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण,
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
जितकी प्रसिद्धी मिळवाल,
तितकेच शत्रू निर्माण कराल,
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.”
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका,
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.
न हरता, न थकता, न थांबता
प्रयत्न करणार्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं.
स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात ,
स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत
असत्य हे अपंग असते ,
दुसर्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.
हे ही वाचा : Best Friend Birthday Wishes in Marathi-
आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका
पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.
जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन ,
निदान एक काम पूर्ण करीन,
निदान एक अडथळा ओलांडीन,
निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
“ अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास
आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत.”
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
सर्वात मोठा रोग
लोक काय म्हणतील?
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
समुद्रातील तुफानापेक्षा
मनातील वादळे अधिक
भयानक असतात.
माणसाला स्वत:चा फोटो काढायला वेळ
लागत नाही, पण स्वत:ची इमेज बनवायला
मात्र वेळ लागतो.
आनंद त्यालाच मिळतो जो स्वत:ला
विसरून दुसर्यांना आनंद देतो... विश्वास ठेवा,
आपण जेंव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते.
आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा
आपल्याकडे जे आहे त्याचा योग्य वापर करा
आणि आयुष्य सुंदर बनवा.
आयुष्यातले काही क्षण एकांतात घालवत जा,
सर्व प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतील,
कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वत:शी होतो.
प्रयत्न करून चुकलात तरी चालेल,
पण प्रयत्न करण्यास चुकू नये.
काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे,
तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.
आपल्या जीवनावर कधीही नाराज होऊ नका,
काय माहीत की तुमच्यासारखे जीवनमान
दुसर्यासाठी एखादे स्वप्नवत असावे.
शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर
आपल्या द्रुढ निश्चयावर अवलंबून असते.
आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच
करावी लागत नाही, त्याचा गंध वार्याबरोबर आपोआप पसरत जातो.
Suvichar Marathi - प्रेरणादायी मराठी सुविचार
सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील.म्हणून वाट
पाहत बसला. तर कदाचित आयुष्यभर वाट
पहावी लागेल पण…
आपण सुखी आहोत असं ठरवलं.
तर आपण आयुष्यभर सुखी राहू…
कोणी आपल्याला वाईट म्हंटलं
तर फारसं मनावर घेवु नये,
कारण या जगात असा कोणीच नाही
ज्याला सगळे चांगलं म्हणतील.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये
खूप संघर्ष करावा लागत
असेल तर स्वत:ला नशीबवान समजा ...
कारण देव संघर्ष करायची
संधी फक्त त्यांनाच देतो
ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
अडचणीच्या काळात सगळ्यात मोठा आधार
म्हणजे स्वत:वरचा विश्वास जो मंद हास्य
करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो
सगळं व्यवस्थित होईल.
आयुष्य कठीण आहे पण...
तक्रारी करून ते सोपेही होत नाही.
लोकांना सुंदर विचार नाही,
तर सुंदर चेहरे आवडतात.
कष्ट इतके शांततेत करा
की यश धिंगाणा घालेल.
जो काळानुसार बदलतो
तोच नेहमी प्रगती करतो.
समस्या तुम्हाला कमकुवत नाही
तर मजबूत बनवायला येतात.
- सुविचार-
मित्रांनो प्रेरणादायी, सुंदर, अर्थपूर्ण सुविचार मी लेखामध्ये आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे. जे आपल्याला आवडतील अशी मला आशा आहे. असे सुविचार नेहमी वाचत जा. आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यास हे नक्कीच मदत करतील.
ज्यांच्या कडून काही अपेक्षा नसतात
तेच लोक अनेकदा चमत्कार करतात.
भविष्य या गोष्टीवर अवलंबून आहे
की तुम्ही आज काय करताय.
मनाला उचित विचारांची सवय लावली की
उचित कृती आपोआपच घडते.
आयुष्यात तुम्ही किती माणसे जोडली
यावर तुमची श्रीमंती कळते.
प्रत्येक प्रयत्नात कदाचित यश मिळणार नाही,
परंतु प्रत्येक यशाचं कारण प्रयत्न असतो.
उत्पन्न कमी असेल तर खर्चावर आणि
ज्ञान कमी असेल तर शब्दावर नियंत्रण ठेवा.
अज्ञान नेहमी परिवर्तनास घाबरत.
प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा
आपोआपच सापडतात.
यश मिळाल्याने लोकांना आपली ओळख होते
तर अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होते.
लोकांचे सल्ले घेत रहा कारण ते फुकट असतात,
निर्णय मात्र स्वत:च घ्या कारण तो अमूल्य असतो.
माफी मागून लहान बना मात्र
खोट बोलून मोठ बनु नका.
पैशाने गरीब असला तरी चालेल
परंतु मनाने गरीब राहू नका .
समुद्रात कितीही वादळ झाले तरी
समुद्र आपली शांतता सोडत नाही.
भूक आहे तितक खाण ही प्रकृती,
भुकेपेक्षा जास्त खाण विकृती,
आणि स्वत: उपाशी राहून दुसर्याची
भूक भागवणे ही संस्कृती.
कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही,
जे शेवटपर्यंत प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होत.
भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो,
रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो.
कासवाच्या गतीने का होईना थोडी प्रगती करा,
खूप ससे आडवे येतील, त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर,
ते प्रत्येक गोष्ट वेगळे पणाने करतात.
टीका करणार्या शत्रूपेक्षा दिखाऊ
स्तुती करणार्या मित्रांपासून सावध रहा.
Best - Marathi Suvichar
विचार असे मांडा की तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
प्रसिद्धी ही एक अशी गोष्ट आहे ती कितीही
मिळाली तरी मनुष्याची तहान भागत नाही.
नाही हा शब्द तुमच्या मनात येत नाही
तोपर्यंत सर्व काही शक्य आहे.
खरी स्वप्न तीच असतात जी आपल्याला
उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर
उठण्यास भाग पाडतात.
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत,
यशस्वी होणारी लोक कारणं सांगत नाहीत.
परिस्थितीबद्दल काळजी करू नका,
आपण जिथे आहात त्यापलीकडे जाण्याचा
प्रयत्न करा, प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत.
जीवनात त्रास त्यांनाच होतो जे जबाबदारी स्वीकारतात,
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाहीत,
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा
मोजू नका, कधी डोळ्यात अश्रु आले तर ते पूसायला
किती जण येतात ते मोजा.
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान
भागाविणारे श्रेष्ठ .
मन ओळखणार्यांपेक्षा,
मनं जपणारी माणस हवीत,
ओळख क्षणभरासाठी असते,
तर जपणूक आयुष्यभरासाठी.
हे ही वाचा : Heart Touching Birthday Wishes for Brother
जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर
जळते, त्याचा तिरस्कार कधीच करू नका ,
कारण ती व्यक्ती तुम्हाला स्वत:पेक्षा उत्कृष्ट
व्यक्ती मानते म्हणून जळत असते.
मोत्यांच्या हारापेक्षा
घामाच्या धारांनी
मनुष्य शोभून दिसतो.
नात्यांची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे,
एक दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर,
आयुष्यात एकटे राहाल.
यशाकडे नेणारा जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे.
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
वाणी गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
Motivational - Marathi Suvichar
प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे
हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट
आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न
मात्र आपल्या हातात असतात.
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा,
ज्ञानाचा प्रकाश कधी कोठून
येईल ते सांगता येत नाही.
जगा इतक की आयुष्य कमी पडेल,
हसा इतक की आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा की
परमेश्वराला देणे भाग पडेल.
कोणाच्याही सावलीखाली उभा राहून
स्वत:ची सावली निर्माण होत नाही,
स्वत:ची सावली निर्माण करण्यासाठी
स्वत: उन्हात उभे रहावे लागते.
कोणी कौतुक करो वा टीका
लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते,
तर टीका सुधारण्याची संधी.
Inspirational Marathi Suvichar - सुविचार
कोणीही वाईट स्वभावाचा नसतो,
आपले विचार त्याच्याशी पटले नाही
तर आपल्याला तो वाईट वाटायला लागतो.
पैशाने पूर्ण केलेली स्वप्ने
मरेपर्यंत टिकतात, पण कष्टाने पूर्ण
केलेली स्वप्ने इतिहास घडवतात.
आयुष्यात आपल्याला बरच काही मिळत असत,
आपल्याला ते ओळखाता आला पाहजे , आणि घेता
आल पाहिजे.
आनंद हा साठवून ठेवायचा नसतो,
तो सर्वांना वाटायचा असतो.
रूसलेल्या मौना पेक्षा
बोलक्या तक्रारी चांगल्या असतात.
जर ध्येय मोठे असेल ना तर
प्रयत्न ही मोठेच केले पाहिजेत.
पैसा काय भिकारीही कमावतो,
माणसं कमवता आली पाहिजेत.
तोंडाने माफ करायला सोपे असते,
मनाने माफ करायला धाडस लागते.
आईच प्रेम समुद्रासारखं असत,
त्याची सुरवात पाहू शकता पण
शेवट पाहू शकत नाही.
आयुष्य जगण्यासाठी
फक्त विचारांची नाही तर
सुविचारांची गरज लागते.
काही व्यक्ति मेणासारखं वितळून
नाती घट्ट टिकवतात, तर काही उगाचच
अग्नी सारखे जळत असतात.
😊रोज एक चांगला सकारात्मक सुविचार वाचत जा व आपल्या मित्र मंडळीत शेअर करत रहा. काही दिवसात आपोआप तुम्हाला तुमच्या विचारात व आचरणात फरक झालेला दिसून येईल . तर निवडा एक सुंदर सुविचार आणि सुरवात करा आजच शेअर करायला.🙏
विचार ही यशाची पहिली पायरी आहे.
आयुष्य हसवेल तेंव्हा ओळखायच
आपल्या चांगल्या कर्माच फळ आहे
आणि जेंव्हा रडवेल ओळखायच की
चांगलं कर्म करण्याची वेळ आली आहे.
आपले भविष्य बदलत नसेल तर
आपल्या सवयी बदला, चांगल्या सवयी
आपल भविष्य बदलतील.
स्वप्ने नवसाने पूर्ण होत नाहीत तर
त्याकरिता मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो.
विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा
प्रयत्न करण्यात दिवस घालवा,
कारण विचाराने माणूस खचतो
आणि प्रयत्नाने प्रगतीच्या
मार्गावर पोहचतो.
ईश्वराकडून मनासारखं मिळाल नाही तर नाराज होऊ नका
कारण ईश्वर अस कधीच देणार नाही जे तुम्हाला चांगलं दिसेल
तर तो तेच देणार जे तुमच्यासाठी चांगलं असेल.
तुम्ही प्रत्येक वेळी नवीन
चूक करत असाल तर समजा
तुम्ही प्रगती करत आहात.
रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीब लागत,
पण हे नशीब मिळवण्यासाठी दिवसभर
इमानदारीच आयुष्य जगाव लागत.
👉 सुंदर मराठी सुविचार 🙏🙏
वेळ चांगली असो की वाईट
शब्दाला जागण व शेवटपर्यंत
साथ देणं यालाच माणुसकी म्हणतात.
खोट सहज विकल जात कारण
खर विकत घेण्याची कुणाची
ऐपत नसते.
मोठ होणेकरिता लहान होऊन जगावं लागत
सुख मिळवण्याकरिता दुख:च्या सागरात पोहाव लागत.
लोक तुमच्या विषयी काही चांगलं ऐकलं
तर संशय व्यक्त करतात, पण वाईट ऐकलं
तर पटकन विश्वास ठेवतात.
लोकांना स्पष्टीकरण देऊन आपला वेळ वाया घालवू नका,
लोक फक्त तेच ऐकतात जे त्यांना ऐकायचं असत.
माणसाच्या जीवनात येणारी संकटे
ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक असतात.
जेंव्हा काही माणसांना तुमच्यातले चांगले सहन होत नाही,
तेंव्हा ते इतरांना वाईट सांगायला सुरवात करतात.
निंदेला घाबरून आपलं धेय सोडू नका,
कारण ध्येय साध्य होताच निंदा करणार्यांची मत बदलतात.
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद
घेऊन येतात , पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.
स्वत:ची वाट स्वत:च बनवा ,
कारण इथे लोक वाट दाखवायला नाही
तर वाट लावायला बसलेत.
तुम्हाला कोणी नाकारल तर नाराज होऊ नका,
कारण महागड्या वस्तू स्वीकारण्याची
त्यांची लायकी नसते.
जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात,
त्यांचा निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वत:जवळ ठेवा.
एकदा कर्तुत्व सिद्ध झालं की, संशयान बघणार्या
लोकांच्या नजरा अपोआप आदरान झुकतात.
काही नात्यांना नाव नसतात , तर काही नाती
फक्त नावापुरतीच असतात.
तुमच्यावर हल्ला करणार्या शत्रूला घाबरू नका,
पण तुमची खुशामत करणार्या मित्राला घाबरा.
पराभवाची भीती बाळगू नका,
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकतो.
लोक तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असतात,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.
माझ्या माग लोक काय म्हणतात याने
मला काहीच फरक पडत नाही, तर माझ्या समोर
बोलण्याची त्यांची हिम्मत नाही यातच माझा विजय आहे.
रात्रभर गाढ झोप लागण याला सुद्धा नशीब लागत .
पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानदारीच आयुष्य जगावं लागत.
मोठ होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागत,
सुख मिळवण्यासाठी दुख:च्या सागरात पोहाव लागत.
वाईटाची संगत ही नेहमी नुकसानकारकच असते मग ती कशीही असो
कोळसा पेटलेला असतो तेंव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेंव्हा हात काळे करतो.
पांढर्या स्वच्छ कपड्यातील बेमाईंनी पेक्षा ,
मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग रुबाबदार असतो.
तुम्ही तो पर्यंत हरत नाही,
जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करण सोडत नाही.
गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी उडणे सोडत नाही,
विना अहंकार लहान सेवाही महानच असते.
छत्री पावसाला थांबवू शकत पण पावसात थांबण्याचे
धाडस नक्कीच देऊ शकते.
तुम्ही गरीब म्हणून जन्माला यात तुमचा दोष नाही
पण गरीब म्हणून मेला तर हा नक्कीच तुमचा दोष आहे.
जी माणसे दुसर्याच्या चेहर्यावर आनंद निर्माण करतात
ईश्वर त्यांच्या चेहर्यावरचा आनंद कमी होऊ देत नाही.
आयुष्य घडवायच की बिघडवायच हे पूर्णत: तुमच्या हातात आहे.
पंख असून उपयोग नाही , उंच भरारी घेण्यासाठी आत्मविश्वासाची
गरज असते.
मित्रांनो हे प्रेरणादायी मराठी सुविचार वाचून आपला दिवस आनंदी व उत्साही बनवा व आपले या लेखाबद्दलचे मत व्यक्त करायला विसरू नका. धन्यवाद ! 🙏🙏🙏
हे ही जरूर वाचा : वाढदिवस शुभेच्छा















