प्रस्तावना
आजच्या AI च्या युगात आपल्याला कोणत्याही विषयावर माहिती हवी असेल अथवा मनात काही प्रश्न असेल तर गूगल सर्च करण्याची काहीच गरज पडणार नाही कारण ChatGPT च्या मदतीने आपल्याला हवी ती माहिती, उत्तरे अगदी काही सेकंदात आपल्या मोबाईलवर मिळवू शकता. याकरिता मोबाईलमध्ये ChatGPT चा वापर कसा करायचा याची योग्य माहिती How to use ChatGPT in Mobile या लेखामध्ये अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
Login कसे कराल
सर्वात प्रथम आपल्याला प्ले स्टोर वरुन Open AI चे ChatGPt हे अॅप इंस्टॉल करून ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्यावर Welcome to ChatGpt ची विंडो ओपन होईल. यामध्ये ३ पर्याय दिसून येतील. एक असेल Continue with google म्हणजे तुमच्या मोबाइलवर असलेल्या गूगल अकाऊंट ने कंटिन्यू करू शकता.
दूसरा पर्याय असेल Log in or Sign up म्हणजे दुसर्या एखाद्या ई - मेल आयडी ने रजिस्टर करून लॉगिन करू शकता आणि तिसरा पर्याय असेल Continue as Guest म्हणजेच रजिस्टर न करता आपण डायरेक्ट चॅट करून आपले प्रश्न विचारू शकता. परंतु गेस्ट पर्यायातून जर आपण ChatGPT वापरलात तर आपल्याला ChatGPT चे बरेच features वापरता येणार नाहीत जसे चॅट हिस्टरी, चॅट पिन करणे , वॉइस चॅट, Share चॅट यासारखे.
परंतु अकाऊंट मधून लॉगिन करून आपण ChatGPT ला जे काही प्रश्न विचारून माहिती घेऊ ती सर्व माहिती चॅट हिस्टरी मध्ये सेव्ह रहाते, तसेच काही महत्वाचे चॅट असातील तर ते पिन करून ठेऊ शकतो, चॅटची लिंक शेअर करू शकतो म्हणून यातील सोपा आणि चांगला पर्याय म्हणजे Continue with google या पर्यायावर क्लिक करा.
हे ही वाचा : ChatGPT शिकण्यासाठी सर्वोत्तम पुस्तके
Chatbox चा वापर
आता आपल्या मोबाईल मध्ये जितके गूगल अकाऊंट असतील ते स्क्रीनवर दिसून येतील. यातील आपल्याला हवा तो अकाऊंट सिलेक्ट करू शकता. अकाऊंट सिलेक्ट झाल्यावर पेज मध्ये खाली कंटिन्यूचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
आता Tell us about you चे पेज ओपन होईल यामध्ये आपले नाव आणि जन्म तारीख नोंद करा. खाली कंटिन्यूचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. ChatGPT चे Chatbox चे पेज ओपन होईल. यामध्ये Ask ChatGPT चा बॉक्स दिसेल त्याठिकाणी आपण आपल्याला हवा तो प्रश्न विचारू शकता.
आपण ज्या भाषेत प्रश्न विचाराल त्या भाषेत काही सेकंदातआपल्याला उत्तर मिळेल. आपल्याला हवी ती माहिती आपण येथे विचारू शकता. आपण विद्यार्थी असाल तर एखादा कठीण प्रश्न अथवा गणित आपण सोडवून घेऊ शकता. ग्राहिणी असाल तर रेसीपी विचारू शकता. नोकरी करिता resume तयार करून घेऊ शकता.
समझा आपल्याला टाइप करण्याचा कंटाळा आला असेल तर यामध्ये Mic चा 🎤आयकॉन असेल त्यावर क्लिक करा, Mic चालू होईल यामध्ये आपण बोलून आपला प्रश्न विचारा व See Text वर क्लिक करून प्रश्न चेक करा व अॅरो वर क्लिक करा. तुम्हाला तुमचे प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल.
समझा आपल्याला इमेज तयार करून हवी आहे तर Chatbox मध्ये प्लस आयकॉनवर क्लिक करा वेगवेगळे पर्याय दिसून येतील यामध्ये खाली क्रिएट इमेज वर क्लिक करा. Chatbox मध्ये इमेज आयकॉन दिसून येईल आता येथे आपल्याला जशी इमेज हवी आहे तसा प्रॉम्प्ट लिहा.
उदा. एक ७० वर्षाची वयस्कर महाराष्ट्रीयन बाई भाजी मंडईत भाजी विकत बसली आहे.
Prompt चा वापर
मित्रांनो ChatGPT मध्ये आपल्याला हवी ती पूर्ण माहिती मिळण्यासाठी प्रॉम्प्ट सगळ्यात महत्वाचा आहे. प्रॉम्प्ट बद्दल मी यापूर्वी Prompt म्हणजे काय? हा लेख लिहलेला आहे तो वाचून घ्या म्हणजे तुम्हाला प्रॉम्प्ट कसा लिहावा हे समजून जाईल.
इमेज तयार व्हायला थोडा वेळ लागेल पण एक चांगली इमेज तयार झालेली पहायला मिळेल. आपण प्रॉम्प्ट जितका डीटेल लिहाल तितकी छान इमेज अथवा माहिती मिळत असते.
ChatGPT Features
Photo :
समझा आपल्याकडे एखादा फोटो आहे किंवा एखादी वस्तु आहे आणि त्याची माहिती आपल्याला हवी आहे तर Chatbox मध्ये प्लस आयकॉन वर क्लिक करा आपल्या मोबाइल मध्ये फोटो असेल तर फोटो वर क्लिक करून मोबाइल गॅलरी मधून फोटो सिलेक्ट करा किंवा कॅमेरा मधून त्या वस्तूचा फोटो काढा सेंड करा काही क्षणात आपल्याला त्या वस्तूबद्दल माहिती आलेली दिसून येईल अशा प्रकारे आपण हवी ती माहिती मिळवू शकता.
Voice Chat :
समझा आपल्याला वॉइस चॅट करायचे असेल म्हणजेच बोलून प्रश्न विचारला तर ChatGpt ही बोलूनच उत्तर देईल. याकरिता Mic च्या जवळच आपल्यालाChatGPT चा वापर कसा करायचा हे अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहू शकता :-
Project :
आता समझा तुम्ही ठराविक एखाद्या प्रोजेक्ट वर काम करत आहात आणि त्यासंबधित असणारे सर्व चाट एकाच heading खाली सेव्ह करून ठेवायचे असतील तर वरती कोपर्यात मेनू वर क्लिक करा. मेनूमध्ये आपल्याला न्यू प्रोजेक्टचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. नवीन विंडो ओपन होईल यामध्ये आपल्या प्रोजेक्टचे नाव लिहा व क्रिएट प्रोजेक्ट वर क्लिक करा आपला नवीन प्रोजेक्ट तयार होईल.
या प्रोजेक्ट संबधीच्या पीडीएफ फाइल सुद्धा आपण यामध्ये अॅड करून ठेवू शकता. आपल्या प्रोजेक्ट विषयी लागणारी माहिती नेहमी कशा फॉरमॅट मध्ये हवी याविषयी जर सूचना देऊन ठेवला तर ChatGPT प्रत्येक वेळी त्या फॉरमॅट मध्ये माहिती देईल. दरवेळेस आपल्याला त्या सूचना द्याव्या लागणार नाहीत. हा प्रोजेक्ट तुम्हाला मेनू मध्ये दिसून येईल.
तुम्हाला नवीन चॅट ओपन करायचे असेल तर मेनू मध्ये न्यू चॅटचा पर्याय असेल त्यावर क्लिक करून तुम्ही नवीन चॅट सुरू करू शकता.
अधिक माहितीसाठी : How to Use ChatGPT
Temporary Chat :
Chatbox च्या वरती आपल्या उजव्या बाजूला आपल्याला एक सर्कल दिसून येईल त्यावर क्लिक केल्यावर Temporary चॅटची विंडो ओपन होईल यामध्ये आपण जे चॅट कराल ते आपल्या चॅट हिस्टरी मध्ये सेव्ह राहणार नाही ते ऑटोमॅटिक डिलीट होईल.
Rename/Delete/ Share :
आता तुमचे कोणतेही चॅट ओपन करा वरच्या कोपर्यात तीन डॉट वर क्लिक करा यामध्ये तुम्ही चॅट ला Rename करू शकता, पिन करणार असाल तर पिन करू शकता, चॅट डिलीट करायचा असेल तर डिलीट करू शकता तसेच जर चॅट तुम्हाला इतर कोणाला शेअर करायचे असेल तर वरती शेअर चा पर्याय असेल त्यावर क्लिक करा खाली शेअर लिंकचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून चॅटची लिंक आपण Whatsapp अथवा Gmail ला शेअर करू शकता.
तर मित्रांनो अशा प्रकारे ChatGPT चा वापर कसा करायचा हा लेख वाचून आपण अगदी सहजपणे ChatGPT चा मोबाईल मध्ये वापर करून हवी ती माहिती अथवा इमेज मिळवू शकता. How to Use ChatGPT in Mobile ही माहिती आपल्याला आवडली असल्यास कमेंट करायला विसरू नका.
FAQ : नेहमी विचारले जाणारे प्रश्न
१. ChatGPT मोबाईलमध्ये कसा डाउनलोड करायचा?
ChatGPT चा मोबाईल मध्ये वापर करण्यासाठी Android वापरकर्त्यांनी Play Store मध्ये व iPhone वापरकर्त्यांनी App Store मधून “ChatGPT” असे शोधून Open AI चे अधिकृत अॅप इंस्टॉल करावे. इंस्टॉल झाल्यानंतर अॅप ओपन करून Gmail किंवा इतर पर्यायाने लॉगिन करता येते.
२. ChatGPT वापरण्यासाठी लॉगिन आवश्यक आहे का?
होय, ChatGPT वापरण्यासाठी लॉगिन करणे आवश्यक आहे. लॉगिन केल्यामुळे तुमचे चॅट सेव्ह राहतात आणि पुढेही तुम्ही त्यांचा वापर करू शकता.
३. मोबाईलमध्ये ChatGPT कसा वापरायचा?
अॅप ओपन केल्यानंतर खालील चॅट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न टाइप करा आणि Send करा. काही सेकंदात तुम्हाला उत्तर मिळते. तुम्ही अभ्यास, लेखन, अर्ज, भाषण, माहिती शोधणे अशा विविध गोष्टींसाठी वापर करू शकता.
४. ChatGPT मोबाईलमध्ये मोफत आहे का?
ChatGPT चे बेसिक व्हर्जन मोफत उपलब्ध आहे. मात्र काही प्रीमियम फीचर्स वापरण्यासाठी सशुल्क प्लॅन घ्यावा लागू शकतो.
५. ChatGPT कोणत्या भाषेत वापरता येतो?
ChatGPT मराठी, हिंदी, इंग्रजी यासह अनेक भाषांमध्ये प्रश्न समजू शकतो आणि उत्तर देऊ शकतो.
Read More : १५०० रुपयांत Best Smartphone २०२६
धन्यवाद ! जय महाराष्ट्र !



