वाक्यप्रचाराचे अर्थ व वाक्यातील उपयोग- Vakprachar in Marathi
वाक्यप्रचार म्हणजे मराठी भाषेमध्ये शब्द्समुहांचा वाक्यात उपयोग करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा विशिष्ट व वेगळ्या मार्गाने भाषेत रूढ झालेल्या शब्दसमूहास वाक्यप्रचार संबोधले जाते. याचा आपण रोजच्या बोलण्यात नेहमी वापर करत असतो. आपल्या मराठी भाषेची ही आगळी वेगळी गोडी लहानपणापासूनच मुलांना माहीत असावी याकरिता तसेच शालेय शिक्षणात ही याचे शिक्षण दिले जाते. यातील काही निवडक 60 वाक्यप्रचारचे अर्थ व त्याचा वाक्यातील उपयोग कसा केला जातो याचे उदाहरण ही दिले आहे.
60 best Phrases in Marathi :
वाक्याप्रचाराचा अर्थ व त्याचा वाक्यात उपयोग
मुख्यमंत्र्यांनी गृहखात्याची सूत्रे हाती घेऊन
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा निर्वाह केला.
पांग फिटणे – सार्थक होणे
वृद्ध आई वडिलांची सेवा केल्यास जीवनाचे पांग फिटते.
हातावर हात मारणे – सहमत होणे
गावकर्यांनी गावातील अडचणी सोडवण्यासाठी एकमेकांच्या हातावर हात मारला.
अवहेलना करणे – तुच्छ लेखणे
आपल्या नावडत्या व्यक्तीची लोक नेहमी अवहेलना करतात
आकाशाला गवसणी घालणे – अशक्य गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न करणे.
देशातील जातीयता नष्ट करून टाकणे म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे.
आटा पिटा करणे – एखादे ध्येय साध्य करणेसाठी खूप कष्ट करणे.
सचिन तेंडुलकरने क्रिकेटर होणेकरिता जीवाचा आटा पिटा केला.
अंगाचा तिळपापड होणे – खूप राग येणे
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा निर्वाह केला.
कृतकृत्यता मानणे - धन्यता मानणे
साहेब आपल्याला भेटायला घरी आल्याचे पाहताच नोकराने कृतकृत्यता मानली.
ग्रह पसरणे – समज होणे.
कॉम्प्युटर वापरायला आल्याशिवाय नोकरी मिळत नाही असा सगळीकडे ग्रह पसरला आहे.
साहेब आपल्याला भेटायला घरी आल्याचे पाहताच नोकराने कृतकृत्यता मानली.
ग्रह पसरणे – समज होणे.
कॉम्प्युटर वापरायला आल्याशिवाय नोकरी मिळत नाही असा सगळीकडे ग्रह पसरला आहे.
रसातळाला जाणे – नाश पावणे
शिक्षणाशिवाय अनेक माणसांचे जीवन रसातळाला जाते.
पांग फिटणे – सार्थक होणे
वृद्ध आई वडिलांची सेवा केल्यास जीवनाचे पांग फिटते.
हातावर हात मारणे – सहमत होणे
गावकर्यांनी गावातील अडचणी सोडवण्यासाठी एकमेकांच्या हातावर हात मारला.
अवहेलना करणे – तुच्छ लेखणे
आपल्या नावडत्या व्यक्तीची लोक नेहमी अवहेलना करतात
आकाशाला गवसणी घालणे – अशक्य गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न करणे.
देशातील जातीयता नष्ट करून टाकणे म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे.
आटा पिटा करणे – एखादे ध्येय साध्य करणेसाठी खूप कष्ट करणे.
सचिन तेंडुलकरने क्रिकेटर होणेकरिता जीवाचा आटा पिटा केला.
अंगाचा तिळपापड होणे – खूप राग येणे
पतीने चांगल्या पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिल्याचे समजताच पत्नीच्या अंगाचा तिळपापड झाला.
कानात मुंग्याचे वारूळ जमणे – अतिशय राग येणे
मुलगा परीक्षेत नापास झाल्याचे कळताच आईच्या कानात मुंग्याचे वारूळ जमले.वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा- वाक्यात उपयोग करा
कानोसा घेणे – अंदाज घेणेपोलिस चोराच्या ठावठिकाणाचा कानोसा घेत होते.
आभाळ कोसळणे – फार मोठे संकट येणे
एकुलता एक कमावणारा मुलगा मरण पावल्याने वृद्ध आई वडिलांवर आभाळ कोसळले.
खाली मान घालणे – अपमानित होणे
मुलाने केलेल्या वाईट कृत्याने वडिलांना मान खाली घालावी लागली.
गंगेत घोडे न्हाणे – सर्व इच्छा पूर्ण होणे
अनेक महीने परिश्रम करून स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याने राजेशचे घोडे गंगेत न्हाले.
चेव येणे – स्फूर्ती येणे
सुभाषचंद्र बोस यांचे भाषण ऐकल्यावर आझाद हिंद सेनेला चेव आला.
जीव कासावीस होणे – अस्वस्थ होणे
मुलाच्या भेटीसाठी आईचा जीव कासावीस झाला होता.
जीभ चाचरणे – क्षणभर गडबडून जाणे
तंबाखू खात असताना वडिलांना पाहताच रमेशची जीभ चाचरली.
जे पिंडी ते ब्रम्हांडी – जे जे एक वस्तूत असते ते ते एकूण विश्वात असते.
1948 साली महात्मा गांधी पंचतत्वात विलीन झाले, जे पिंडी होते ते ब्रम्हांडी झाले.
ताबा घेणे – आपल्या स्वाधीन करून घेणे .
धनिकाच्या सर्व संपत्तीचा सरकारने ताबा घेतला.
दगा देणे – फसवणे
शामने रामला आर्थिक व्यवहारात दगा दिला .
Vakprachar in Marathi- विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
दत्त म्हणून उभे राहणे – अनपेक्षितपणे समोर येणे
विजयसमोर नवीन संकटे नेहमीच दत्त म्हणून उभी राहतात.
पारा चढणे – अतिशय राग येणे
रमेशने चोरी केल्याचे समजताच त्याच्या वडिलांचा पारा चढला.
पुराणातील वांगी पुराणात – पुराणातील उपदेशाप्रमाणे प्रत्यक्ष न वागणे
अंधश्रद्धेविरुद्ध बोलणार्यांनीच आपल्या घरात देवीला बळी दिला , म्हणतात ना पुराणातील वांगी पुराणातच.
पोटात कावळे ओरडणे – अतिशय भूक लागणे.
खूप कष्ट केल्याने मानसीच्या पोटात कावळे ओरडू लागले.
पंचप्राण कानाशी येणे – एखादी गोष्ट ऐकण्यासाठी खूप आतुर होणे.
परदेशी गेलेल्या भावाचा आवाज ऐकण्यासाठी त्याच्या बहिणीचे पंचप्राण कानाशी आले होते.
प्रतीक्षा करणे – वाट पहाणे
मुलगी आपल्याला केंव्हा भेटणार याची आईला प्रतीक्षा लागली होती.
भीक न घालणे – दुर्लक्ष करणे
इंग्रजांनी भारतीयांवर अनेक बंधने लादली तरी भारतीय क्रांतिकारकांनी त्यांना भीक घातली नाही.
माग लागणे – पत्ता/शोध लागणे
घड्याळावरून पोलिसांनी गुन्हेगाराचा माग काढला.
मीमांसा करणे – विश्लेषण करणे
अनेक विद्वानांनी गीतार्थाची मीमांसा केली.
राजी नसणे – तयार नसणे
हरिष काही केल्या नोकरी करण्यास राजी नव्हता.
अंगवळणी पडणे – सवय लागणे
खोटे बोलणे सुजीतच्या अंगवळणी पडले होते.
Vakprachar in Marathi
अरेरावी करणे – मग्रुरीने वागणे
कित्येकदा अनेक विद्यार्थी शिक्षकांशी अरेरावी करतात.
अर्धपोटी राहणे – पोटभर न खाणे
रोजंदारी करणार्या कामगारांना अनेक वेळेस अर्धपोटी रहावे लागते.
उसनवारी करणे – दुसर्याची वस्तू काही काळासाठी मागून आणणे.
उसनवारी करून श्रीमंतीचा देखावा करता येत नाही.
उर भरून येणे – भावना दाटून येणे
आपल्या मुलाची प्रगति पाहून आईचा उर भरून आला.
अंगाला कापरे सुटणे – फार घाबरणे
जंगलात समोरच वाघ पाहून माझ्या अंगाला कापरे सुटले.
कणव येणे – दया येणे
गरीब मुलांना पाहून स्वातीला त्यांची दया आली.
कान फुंकणे – मनात भरवणे
राजेश विजयविषयी सतत राहुलचे कान फुंकत असतो.
कीड माजणे – नको त्या वाईट गोष्टी पसरणे
आज कालच्या तरुण पिढीत व्यसनाची कीड माजली आहे.
कुरुक्षेत्र माजवणे – वादावादी करणे
क्षुल्लक कारणावरून मित्राने माझ्याशी कुरुक्षेत्र माजवले.
कुंपणाने शेत खाणे – रक्षणकर्त्याने भक्षण करणे.
विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या मदतीचा अधिकार्यानेच गैरवापर केला.
कुंपणानेच शेत खाल्यावर न्याय कुणाकडे मागणार.
मराठी वाक्प्रचार अर्थसाहित व वाक्यात उपयोग - Vakprachar in Marathi
काळाची पावले ओळखणे - बदलत्या परिस्थितीचे भान ठेवणे
काळाची पावले ओळखून रमेशरावांनी आपल्या व्यवसायामध्ये बदल केले.
काळाची पावले ओळखून रमेशरावांनी आपल्या व्यवसायामध्ये बदल केले.
कोंबड्याचा मांडा करणे – काटकसरीने संसार करणे
आशाताईंनी कोंबड्याचा मांडा करून मुलांचे शिक्षण पूर्ण केले.
आशाताईंनी कोंबड्याचा मांडा करून मुलांचे शिक्षण पूर्ण केले.
कनपटीस बसणे – चिकाटीने काम करून घेणे
आईने कनपटीस बसून मुलांकडून अभ्यास करून घेतला.
आईने कनपटीस बसून मुलांकडून अभ्यास करून घेतला.
खेटे घालणे – वारंवार जाणे
कोर्टाचा निकाल लागेपर्यंत कोर्टात खेटे घालावे लागतात.
कोर्टाचा निकाल लागेपर्यंत कोर्टात खेटे घालावे लागतात.
घामाघूम होणे – घाबरून जाणे
मुलाने केलेल्या कर्जाचा आकडा ऐकून वडील घामाघूम झाले.
मुलाने केलेल्या कर्जाचा आकडा ऐकून वडील घामाघूम झाले.
गोरामोरा होणे – फार घाबरणे
आपली चोरी पकडली जाणार हे कळताच अमोलचा चेहरा गोरामोरा झाला.
चाड असणे – जाणीव असणे
आईवडिलांच्या कष्टाची रितुला चाड आहे.
आईवडिलांच्या कष्टाची रितुला चाड आहे.
चूल खोळंबणे – शिजवायला काहीही नसणे
आदिवासी लोकांची दाण्यापाण्याअभावी चूल खोळंबली होती.
आदिवासी लोकांची दाण्यापाण्याअभावी चूल खोळंबली होती.
जिवावर येणे – नकोसे वाटणे
दिवसभर काम करून थकलेल्या सुनीलला घरातून बाहेर पडणे जिवावर आले होते.
दिवसभर काम करून थकलेल्या सुनीलला घरातून बाहेर पडणे जिवावर आले होते.
जिवापलीकडे जपणे - स्वत:च्या प्राणापेक्षाही जास्त काळजी घेणे.
आई आपल्या मुलांना जिवापलीकडे जपत असते.
जीव ओवाळून टाकणे – अतिशय प्रेम करणे
मावळे शिवरायांवर आपला जीव ओवाळून टाकत होते.
झिंग चढणे – धुंद, बेभान होणे
रविला मित्रांनी दिलेल्या उत्साहामुळे खेळाची झिंग चढली होती.
टाळ्यांचा गजर होणे – सत्कार होणे
द्रविडने शतक मारताच प्रेक्षकांकडून टाळ्यांचा गजर झाला.
ठपका देणे – दोष देणे
आपल्या भागाचा विकास होत नाही याबद्दल जनता तेथील नेत्याला ठपका देते.
डोक्याला हात लावून बसणे – चिंताग्रस्त होऊन बसणे
मुलाच्या भविष्याचा विचार करून वडील डोक्याला हात लावून बसले.
डोळे ताणून पाहणे – बारकाईने पाहणे.
पुरातील पाण्यामुळे झालेले नुकसान गावकरी डोळे ताणून पहात होते.
डोळ्यात तेल घालून पहाणे – लक्षपूर्वक पहाणे
किल्यावर शिपाई रात्रीचे डोळ्यात तेल घालून पहारा देत होते.
तळमळ होणे – बेचैनी होणे
बरेच वर्षांनी मायदेशी परतणार्या मुलाच्या भेटीसाठी आईची तळमळ होत होती.

धन्यवाद ! जय महाराष्ट्र !
🙏🙏🙏🙏🙏