Android Mobile Tips & Tricks २०२६ - या ८ Hidden Settings ने Phone होईल Super Fast!
Introduction :
Android Mobile Tips & Tricks वापर करून तुम्हाला तुमचा Phone आता पहिल्या पेक्षा अधिक Fast, Safe आणि Smart बनवता येतो. आपण वर्षानुवर्षे Android Phone वापरत असाल, पण अनेकजण या ८ Hidden Settings बद्दल माहीत नसल्याने हे Features वापरत नाहीत!. Phone Slow होणे, Battery लवकर संपणे, Notifications चुकणे या सर्व समस्या आपल्याला या Tips वापरून सोडवता येतात. आज आपण या सर्व टिप्स Step by Step पाहूया - कोणत्याही Technical ज्ञानाशिवाय, फक्त Settings उघडा आणि आपले आयुष्य सोपे करा आणि स्वत:ला स्मार्ट बनवा.
या ८ Android Tips वापरल्यानंतर तुमचा Phone २ पट Faster वाटेल, Battery २ - ३ तास जास्त चालेल आणि Privacy ९० % जास्त Secure होईल - हे सर्व पूर्णपणे मोफत आहे !
टीप नं. १ : Animation Speed कमी करा
Phone 2X Fast वाटेल!
तुम्हाला आठवत असेल तुमचा Phone नवीन असताना किती Fast होता? तेच स्पीड पुन्हा अनुभवायचे असेल तर Developer Options मध्ये Animation Scale 0.5x केल्यास Phone चे पूर्वीचेच स्पीड परत मिळवाल. हे Settings कोणत्याही Android Phone वर काम करते.
Step 1: Developer Options Unlock करा
1. Settings उघडा2. About Phone वर जा
3. Build Number अथवा MIUI Version वर ७ वेळा Tap करा
4. Developer Options Unlock झाले! - 'You are now a developer' असे दिसेल
💡 Pro Tip: Samsung मध्ये Software Information → Build Number मध्ये जा
Step २: Animation Scale बदला
5. Settings → Developer Options उघडा
6. Window Animation Scale शोधा → 0.5x करा
7. Transition Animation Scale → 0.5x करा
8. Animator Duration Scale → 0.5x करा
9. Phone Restart करा — फरक लगेच जाणवेल!
💡 Pro Tip: 0.5x म्हणजे Animations २ पट वेगाने होतात - Phone खूपच Responsive वाटतो
टीप नं. २ : Private DNS
Phone मधून ९०% Ads बंद करा!
App चा वापर करत असताना मध्येमध्ये येणारे Ads बंद करायच्या असतील तर कोणत्याही App ची गरज नाही - फोन मधील फक्त एक Setting बदला आणि Phone मधील ९०% Ads बंद होतील! Ads Load होणार नाहीत यामुळे Battery ची पण बचत होईल.
Step १: Private DNS Set करा
- Settings उघडा
- Network & Internet → Private DNS वर जा
- Samsung मध्ये: Connections → More Connection Settings → Private DNS
- Vivo/Realme मध्ये: Connection & Sharing → Private DNS
- 'Private DNS Provider Hostname' निवडा
- टाइप करा: dns.adguard.com
- Save करा — झाले! ✅
💡 Pro Tip: हे VPN नाही - त्यामुळे Internet Speed कमी होत नाही. पूर्णपणे Safe आहे.
टीप नं. ३: Notification History
चुकीने Delete केलेले Notification परत पाहा!
आपल्या असे बरेच वेळा झाले असेल "अरे, तो WhatsApp Message कोणाचा होता?" हे पुन्हा पहायचे असेल तर आता Notification History Feature मुळे Delete केलेले सर्व Notifications २४ तास परत पाहता येतात! ते ही फक्त एका छोट्याश्या सेटिंगने.
Step १: Notification History Enable करा
- Settings → Notifications वर जा
- Notification History वर Click करा
- Use Notification History Toggle ON करा
- आता Notification Panel मध्ये History Button दिसेल
💡 Pro Tip: हे Feature Android ११ पासून उपलब्ध आहे - सर्व Budget Phones वर काम करते.
टीप नं ४ : Screen Pinning
Phone दुसऱ्याला द्या - Privacy Safe राहील!
मुलांना Phone द्यायचा आहे किंवा मित्राला एखादा Photo दाखवायचा आहे - पण त्यांनी इतर Apps उघडू नयेत? Screen Pinning Feature मुळे फक्त एकच App Lock होते!
Screen Pinning Enable करा
- Settings → Security (किंवा Biometrics & Security) वर जा
- Screen Pinning किंवा App Pinning शोधा
- Toggle ON करा
- आता कोणताही App Open करा
- Recent Apps Button दाबा
- App च्या Icon वर Tap करा → Pin This App निवडा
💡 Pro Tip: Unpin करायला Back + Home बटण एकत्र दाबा - PIN किंवा Password लागेल
टीप ५ : Split Screen
एकाच वेळी दोन Apps वापरा!
आपल्याला बरेच वेळा एका वेळी दोन App चा वापर करायचा असतो जसे आपण YouTube Video पाहताना WhatsApp वर Reply करायचे आहे? तर काळजी करू नका कारण Split Screen मुळे दोन Apps एकाच वेळी Screen वर उघडता येतात - हे सर्व Android 9+ Phones वर काम करते!
Split Screen वापरा
- पहिला App उघडा (उदा. YouTube)
- Recent Apps Button दाबा (Square किंवा III बटण)
- App च्या वरच्या Icon वर Tap करा
- Split Screen किंवा Open in Split Screen निवडा
- खालच्या भागात दुसरा App (उदा. WhatsApp) निवडा
- दोन्ही Apps एकत्र वापरा!
💡 Pro Tip: दोन Apps मधील Divider Line वर Drag करून Size बदलता येतो.
टीप नं. ६ : Dual WhatsApp
एकाच Phone मध्ये दोन WhatsApp!
दोन SIM असलेल्या Phone मध्ये दोन WhatsApp वापरायला Third Party App ची गरज नाही! Android मध्येच हे Feature Built-in आहे - आणि हे १००% Safe आहे.
Dual WhatsApp Enable करा
- Samsung: Settings → Advanced Features → Dual Messenger → WhatsApp Toggle ON
- Vivo/iQOO: Settings → Apps → Clone Apps → WhatsApp Toggle ON
- Realme/OPPO: Settings → Utilities → Clone App → WhatsApp
- POCO/Redmi: Settings → Apps → Dual Apps → WhatsApp Toggle ON
- दुसरा WhatsApp Icon Home Screen वर येईल — दुसऱ्या Number ने Login करा!
💡 Pro Tip: हे Official Android Feature आहे - Modified APK पेक्षा खूपच Safe आहे.
टीप नं. ७ : Adaptive Battery
Battery २-३ तास जास्त चालेल!
Phone Slow असेल किंवा Battery लवकर संपत असेल तर Background मध्ये उघडे असलेले Apps हे मुख्य कारण आहे. Adaptive Battery आणि Background Process Limit या दोन Settings मिळून Battery Life खूपच वाढवतात.
Battery Optimize करा
- Settings → Battery → Adaptive Battery Toggle ON करा
- Developer Options उघडा
- Background Process Limit शोधा
- At most 4 Processes निवडा
- Settings → Apps → कमी वापरले जाणारे Apps शोधा
- त्यांचे Battery → Restricted करा
💡 Pro Tip: Adaptive Battery Phone च्या Usage Pattern शिकतो आणि कमी वापरल्या जाणाऱ्या Apps ची Background Activity आपोआप बंद करतो.
टीप नं. ८ : Wi-Fi Password Share करा
QR Code ने!
"घरचा Wi-Fi Password काय आहे?" हा प्रश्न पाहुणे आले की नेहमी येतो! Password आठवत नाही? काळजी नको - Android मध्ये Wi-Fi Password QR Code मध्ये Share करण्याचे Feature आहे!
Wi-Fi QR Code Share करा
- Settings → Wi-Fi / Connections वर जा
- तुम्ही Connect असलेल्या Wi-Fi Network वर Tap करा
- Share किंवा QR Code Option दिसेल - Tap करा
- एक QR Code दिसेल
- पाहुण्यांनी फक्त Camera ने हा QR Scan करायचा
- Password न सांगता ते Connect होतील! ✅
हे देखील वाचा : 5 GTechnology in India
निष्कर्ष
Android Mobile Tips & Tricks वापरणे किती सोपे आहे हे आज तुम्हाला समजले असेलच! या 8 Tips पैकी आजच किमान 3 Tips वापरा - Animation Speed, Private DNS आणि Adaptive Battery - आणि फरक लगेच जाणवेल. तुमचा Phone नवीन नसला तरी या Settings मुळे तो नवीनासारखा Fast वाटेल. या Tips तुमच्या मित्र-परिवारांनाही Share करा -
कारण हे ज्ञान प्रत्येक Android User साठी उपयुक्त आहे! तुम्ही कोणती Tip वापरणार? Comment मध्ये नक्की सांगा! 😊
वारंवार विचारले जाणारे प्रश्न - FAQ
प्रश्न १: Developer Options Enable केल्याने Phone ला धोका आहे का?
नाही - Developer Options Enable करणे पूर्णपणे Safe आहे. Android च्या Official Documentation नुसार Animation Scale बदलणे किंवा Background Process Limit सेट करणे या Normal Settings आहेत. Warranty बाधित होत नाही. फक्त एक काळजी घ्या - Developer Options मध्ये USB Debugging, OEM Unlocking असे Advanced Options आहेत - ते Enable करू नका जोपर्यंत त्यांची गरज नाही.
प्रश्न २: Private DNS सेट केल्यावर Internet Speed कमी होते का?
नाही — Private DNS हे VPN नाही. VPN मध्ये सर्व Traffic एका Server वरून जाते त्यामुळे Speed कमी होते. Private DNS फक्त DNS Queries Filter करतो - म्हणजे फक्त Ads च्या Requests Block होतात. Internet Speed वर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. उलट Ads Load न झाल्यामुळे Pages जास्त वेगाने उघडतात आणि Battery वाचते.
प्रश्न ३: या Tips सर्व Android Phones वर काम करतात का?
होय — या ८ Tips Android १३,१४,१५ आणि १६ वर काम करतात. Samsung, Vivo, Realme, POCO, Redmi, Motorola सर्व Phones वर या Settings उपलब्ध आहेत - फक्त त्यांची Location थोडी वेगळी असू शकते. उदाहरणार्थ Dual WhatsApp Samsung मध्ये 'Dual Messenger' नावाने असते तर Vivo मध्ये 'Clone Apps' नावाने असते. Settings मध्ये Search Bar वापरून Feature शोधता येते.
प्रश्न ४: Battery वाचवण्यासाठी सर्वात प्रभावी टीप कोणती?
Battery वाचवण्यासाठी टीप नं २ (Private DNS) आणि टीप नं ७ (Adaptive Battery) एकत्र वापरणे सर्वात प्रभावी आहे. Private DNS मुळे Ads Load होत नाहीत - त्यामुळे Background Data कमी होतो. Adaptive Battery Background Apps बंद करतो. या दोन्ही Tips एकत्र वापरल्यास दैनंदिन Battery Life २-३ तास वाढते असा अनेक Users चा अनुभव आहे.
प्रश्न ५: Dual WhatsApp मध्ये दोन्ही Numbers एकाच वेळी Active राहतात का?
होय — Dual WhatsApp मध्ये दोन्ही Numbers एकाच वेळी Active राहतात. दोन्ही Numbers वर Messages येतात आणि दोन्ही वरून Messages पाठवता येतात. हे Feature Dual SIM Phones साठी आहे - Personal आणि Official नंबर वेगळे ठेवण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. Third Party Modified WhatsApp Apps वापरण्यापेक्षा हे Built-in Feature वापरणे कधीही Safe आहे.


